संदेश

सितंबर, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात ५० जागा...

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात ५० जागा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक-१५,तलाठी-२५,चालक-४,शिपाई-६ आदी एकून ५० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी २० सप्टेंबर २०१२ पर्यंत कार्यालयास प्राप्त होतील अशा बेताने पोस्टाने पाठवावेत...  अधिक माहितीसाठी  www. Gadchiroli.nic.in   ह्या  संकेत स्थळला भेट दया ......  by Gajanan Gaikwad
चित्र
------------------ By-balasaheb puri

मंगलमूर्ती गणरायाचे आगमन काही दिवसात होत आहे. त्यानिमित्त काही सेलिब्रिटींसोबत गणेश.

चित्र

मराठवाड्यात दमदार पाउस...

चित्र
मराठवाड्यात दमदार पाउस दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या मराठवाड्यावर वरुणराजा मेहेरबान झाला. रविवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी मुसळधार आणि संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नद्या, नाले भरून वाहत असल्याचे चित्र प्रथमच दिसून आले.  गेल्या आठवड्यात निसर्गाने मराठवाड्या वर पावसाचा अक्षरश वर्षाव केला.....उपरवाला देता हैं तो छप्पर फाडके देता हैं याचा येथील शेतकर्याना अनुभव आला... By Gajanan Gaikwad

Opd aurangabad

चित्र
------------------ By-balasaheb puri

मध्य रेल्वे,मुंबई येथे वर्ग ४ पदांची भरती

चित्र
                               मध्य रेल्वे,मुंबई येथे वर्ग ४ पदांची भरती                       पदाचे नाव-          ट्रकमन ,हमाल,सफाईवाला                        एकूण पदे-                 २५७२+७७ अपंग पात्रता-  १०  वी उत्तीर्ण/ITI /समकक्ष परीक्षा शुल्क- ४०/ - रु. चा धनाकर्ष  Senior Personnel Officer (Recruitment) Railway Recruitment Cell,  Central Railway,  Mumbai.यांचे नावे. अनुसूचित जाती/जमाती/अपंग /सर्व प्रवर्गातील महिलांना परीक्षा शुल्क माफ.  अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- - २५ सप्टेंबर २०१२. अधिक माहितीसाठी व अर्जासाठी  -   http://www.rrccr.com    वर क्लीक करा.     गजानन गायकवाड      डेटा एंट्री ऑपरेटर पंचायत  समिति पाथरी

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा..

चित्र
परभणी जिल्हा हा रबीचा जिल्हा असून, सध्याची पाण्याची परिस्थिती लक्षात घेतली तर जिल्ह्यातील रबीचा हंगाम धोक्यात आहे. त्यामुळे निकष बदलून परभणी जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. इंग्रजांच्या काळापासूनची नजर आणेवारी आजही लागू आहे. पूर्वी जमीन जास्त आणि लोकसंख्या कमी होती. सध्याची परिस्थिती उलट आहे. जमिनी कमी होऊनही अन्नधान्य भरपूर आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करताना निकष बदलावा लागेल. जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्‍वर, निम्न दुधना, मासोळी, करपरा आदी प्रकल्पातील जलसाठा मृतसाठय़ात आहे. जिल्ह्यात खरीपापेक्षा रबीचे क्षेत्र जास्त आहे. सध्याची स्थिती पाहता रबीचा हंगाम धोक्यात आहे. त्याचप्रमाणे बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. बागायती पिकांना पाणी जास्त लागते. परंतुच पाणीच उपलब्ध नसल्याने बागायाती क्षेत्रही धोक्यात आहे. जिल्ह्यातील पावसाच्या नोंदी घेताना विसंगती दिसतात. त्यामुळे मंडळनिहाय निकष ग्राह्य धरुन दुष्काळी भागाला न्याय

सर्कलनिहाय दुष्काळग्रस्त भागांच्या नोंदी घ्याव्यात! : वरपूडकर

चित्र
जिल्ह्यातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील ८६ विहिरींच्या नोंदी बायोमॅट्रीक मीटरने घेतल्या जातात. या नोंदीतही विसंगती दिसते. सिंचन प्रकल्पात पाणी नाही, जमिनीतही पाणी नाही. जमिनीच्या पाणी पातळीची महसूल सर्कलनिहाय नोंदी घेऊन जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४४ टक्के पाऊस झाला. सध्या जरी पाणीपा तळी १ मीटरने खालावली असली तरी उन्हाळ्यामध्ये ही पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता दुष्काळ जाहीर करुन जिल्ह्यात जलसंधारणाची कामे वाढवावी. कोल्हापुरी, सिमेंट बंधारे आणि शेततळे घेण्यासाठी भरीव मदत आम्ही शासनाकडे मागणार आहोत. तसेच कापूस, सोयाबीनच्या अनुदानाचे वाटप झाल्यास दुष्काळी स्थितीत शेतकर्‍यांना हे पैसे कामाला येतील. त्यामुळे या अनुदानाचे तत्काळ वाटप करावे, अशी मागणी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनी पत्रकार परिषदेत केली. by-pravin patil  

आयुष्यातील सौभाग्याचा क्षण : साहेबांसोबत चार पावलं चालू शकलोत .

चित्र
आयुष्यातील सौभाग्याचा क्षण : साहेबांसोबत चार पावलं चालू शकलोत ...... * आयुष्यातील दुर्दैवाचा क्षण : अतिशय मोठ्या VIP Movement ची वाहन व संपर्क व्यवस्था इ. कामामुळे साहेबांचे अंत्यदर्शन घेवू शकलो नाहीत. * साहेबांच्या लातूर भेटीत जवळपास प्रत्येक वेळेस साहेबांची भेट घेवू शकलोत पण अंतिम भेट घेऊ शकलो नाहीत आणि ..हि आयुष्यात नित्यवेदना देणारी घटना असेल..... शहरात असे अनेक जन आहेत ज्यात महसूल , पोलीस , मनपा, विद्दुत अशा अनेक विभागाचे कर्मचारी ,अधिकारी आहेत, शासकीय वाहनांचे वाहन चालक आहेत , जे साहेबांच्या प्रत्येक लातूर भेटीत एकदातरी साहेबांना भेटायचे पण काल यातील बरेचजण पाहुण्यांची गैरसोय होवू नये म्हणून नेमून दिलेले काम करीत होते आणि साहेबांचे अंत्यदर्शन होवू शकणार नाही म्हणून हळहळ करीत होते. त्या आम्हा सर्वांच्या वतीने साहेबांना श्रद्धांजली. डॉ.विकास नाईक , उपजिल्हाधिकारी लातूर.