संदेश

नवंबर, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं

बाळासाहेब मराठी माणसासाठी झटले,मी आजपर्यंत असा लोकांशी कनेक्टेड असलेला नेता पाहिला नाही,बाळासाहेबानी मराठी माणसासाठी राजकारण केले,जे त्यांच्यासोबत होते त्यांचे सोने झाले,शिवाजी पार्कवर इतकी जागा असूनही जागा कमी पडत होती ,इतकी जनता मी आजवर कुणाही नेत्यासाठी पाहिली नाही.अत्यंत सामान्य माणसांना त्यांनी आमदार .नगरसेवक ,खासदार केले. आ.बाबाजानी दुर्रानी,(परभणी हिगोली विधानपरिषद सदस्य ,राष्ट्रवादी कॉग्रेस )

चित्र

हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. आज दुपारी ३.३० वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकासह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांमध्ये जास्तच खालावली होती. राज्यभरातील त्यांचे चाहते आणि शिवसैनिक त्यांच्या प्रकृती विषयी काळजी करत होते... प्रार्थना करत होते. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या चाहत्यांना त्यांचं जाहीर भाषण ऐकण्यास मिळालं होतं. पण, दु:खद बाब म्हणजे याही वेळेस प्रकृती साथ देत नसल्यानं बाळासाहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी उच्चारलेले ‘शिवसैनिकांना प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा होती. पण, काय करू…? माझी दुखणीच चालूच आहेत, पण कमी प्रमाणात.... हे चालूच आहे. आपल्या भेटीला यायची इच्छा असूनही शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालोय. खूप इच्छा होती... यावं, भेटावं, बोलावं... पण, तुम्हाला कल्पना येणार नाही. माझी अवस्था काय आहे ती... नीट

चित्र
चित्र