संदेश

दिसंबर, 2012 की पोस्ट दिखाई जा रही हैं
चित्र

फौजिया खान यांचं रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फोटोसेशन

फौजिया खान यांचं रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फोटोसेशन

सावधान ! राजकीय चेहऱ्याने दहशतवाद येतोय !

स्रोत: NewsBharati Marathi      तारीख: 10/30/2012 पुण्यातल्या स्फोटाच्या प्रकरणात नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे एक  खतरनाक अतिरेकी मकबूल हाजीमिया याला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले. मराठवाड्यात असा अतिरेकी पकडणे हे नवीन नाही. मात्र यावेळी हा अतिरेकी मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन या राजकीय पक्षाचा धर्माबादचा अध्यक्ष आहे. एमआयएम यानावाने हा राजकीय पक्ष हैदराबादहून आता मराठवाड्यात फोफावतो आहे. नुकतेच झालेल्या नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाचे तब्बल ११ नगरसेवक निवडून आले आहेत. तोंडी मुस्लिमांच्या हिताची भाषा जरी या पक्षाचे नेते करत असले तरी सरळ सरळ दहशतवादाला राजकीय चेहरा देण्याचा हा प्रयत्न आहे. या पक्षाचा इतिहास पाहिला की यांची जातकुळीं काय आहे ते सहज लक्षात येते. ऑगस्टमध्ये पुण्यात जंगली महाराज रोडवर सलग चार स्फोट झाले होते. या प्रकरणी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी नांदेडचा इम्रानखान, संभाजीनगरचा (औरंगाबाद) असदखान आणि पुण्यातून फि