akbaruddin owesi

एम आय एम १९२७ मध्ये स्थापन्न झालेली संघटना आहे,या संघटनेवर १७ सप्टेंबर १९४८ ला बंदी घातली होती,आणि ती बंदी १९५७ ला उठवण्यात आली.या संघटनेचा संस्थापक हा बहादूर यारजंग हा होता ,यानेच रजाकार हि संघटना स्थपन करून जनतेला सळो कि पळो केले होते,लातूरच्या कासीम रिजवी च्या हातात या संघटनेचे सूत्रे आल्यानंतर त्याने जनतेचा भयानक सुड घेतला ,
१९७४ मध्ये सुलतान सालौद्दिन ओवेसी याने एम आय एम वर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला,आणि तो यशस्वीही झाला.ओवेसी हा लातूर जवळच्या ऒसा या गावचा .याने १९६० मध्ये हैद्राबाद पालिकेत माल्लेपल्ली हि जागा जिंकली ,आणि तो १९६२ मध्ये आमदार म्हणून निवडून आला.२००८ मध्ये त्याच निधन झाले .याचा मोठा मुलगा असद्दुदिन ओवेसी हा खासदार आहे ,या संघटनेचे ७ आमदार आहेत ,हैद्राबाद पालिकेत ४३ नगरसेवकआणि नांदेड पालिकेत ११ नगरसेवक आहेत.
अक्बारुद्दिन ओवेसी हा सुलतान चा छोटा मुलगा,हा आमदार आहे ,यानेच हिंदू विरुद्ध भाषण देण्याचे धाडस केले,

मुदा हा आहे कि असे भाषण देण्याची गरज काय ?
ओवेसिला कदाचित खर्या इस्लामची ओळख नसावी ,आणि त्याने कुरान हि पूर्ण वाचले नसावे जर त्याने कुराण निट समजावून घेतले असते तर अशी बडबड केलीच नसती ,कारण कुरान मध्ये निरपराध व्यक्तीला मारण्याची परवानगी नाही.एका निरपराध व्यक्तीला मारणे म्हणजे सगळ्या मानव जातीला मारण्याचे पाप लागते अशी कुरान ची धारणा आहे
कुराण ची शिकवण अमलात आननारा हाच खरा मुसलमान असू शकतो ,

मग ओवेसी ला काय समजायाचे ?

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट