Pathri samachar news परभणी जिल्हा माहिती कार्यालय
लाभार्थ्यांना नियमानुसारच कर्जवाटप
परभणी, दि. 29 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे (मर्यादित)
येणा-या कर्ज प्रकरणापैकी ज्यांची कर्ज प्रकरणे मंजुर असतील त्यांना
महामंडळाची कमिटी नियमाप्रमाणे कर्ज वितरीत करेल. या प्रकरणांवर नियमानुसारच
कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग
विकास महामंडळ यांनी कळविले आहे. 000000000
ध्वनीक्षेपणाच्या
वापरासंबंधात कलम 33 लागूपरभणी, दि. 29 : परभणी शहर
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय पक्ष तसेच
उमेदवारांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील शांतता व स्वास्थास बाधा
पोहचू नये तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपणाच्या वापरावर निर्बंध
घालण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) लागू करण्यात आले आहे.
ध्वनीक्षेपणाचा वापर संबंधित पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार
नाही. तसेच सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर ध्वनीक्षेपणाचा
वापर करता येणार नाही. सदर आदेश निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत अंमलात
राहणार आहे.
0000000000
निवडणुकीदरम्यान दक्षता व उपाययोजना करण्याचे आदेश परभणी, दि.
29 : परभणी शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी
दक्षता घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले
आहे. निवडणुकीदरम्यान मतदान केंद्र बळकावणे, धाकदडपशा दाखविणे,
तोतयेगिरी करणे अशा व्यक्तिंवर कार्यवाही करणे, प्रलंबित असलेले वारंट
समन्स बजावण्यासाठी मोहीम हाती घेणे, शस्त्र व दारुगोळा दुकानांची तपासणी
करणे आदी आदेश संबंधित विभागाला देण्यात आले
आहे. 000000000
कलम 144 लागू परभणी, दि. 29 : निवडणूक आचारसंहितेच्या कालावधित
आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या
दृष्टीकोनातून निवडणूक असणा-या क्षेत्रात फौजदारी व्यवहार संहिता 1973 चे
कलम 144 लागू करण्यात आले आहे. सदर आदेशाचा भंग करणा-या
व्यक्तिवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले
आहे. 0000000000
निवडणूक साहित्यासंदर्भात कलम 33 लागू परभणी, दि. 29 : परभणी
शहर महानगरपालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन
सार्वजनिक जागांवर निवडणूक संबंधित साहित्य वापरण्यावर निर्बंध घालण्यात
आले असून मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (डीबी) लागू करण्यात आले
आहे. 000000000000
///////////////////////////////////////////
लिपिक टंकलेखक/ वाहनचालक / शिपाई पदाच्या परीक्षेसाठी 2814 उमेदवार पात्र
परभणी, दि. 27 : जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक /
वाहनचालक / शिपाई संवर्गातील रिक्त पदाच्या परिक्षेसाठी एकूण 2 हजार 814
उमेदवार पात्र ठरले आहेत. या पदांसाठी एकूण 2 हजार 903 अर्ज प्राप्त झाले
होते. यापैकी 89 अर्ज अपात्र ठरले आहेत. लिपिक टंकलेखक पदासाठी 1 हजार 994,
वाहनचालक पदासाठी 219 तर शिपाई पदासाठी 601 अर्ज पात्र ठरले आहेत.
या पदांसाठी 10 परीक्षा केंद्रावर दिनांक 8 एप्रिल 2012 रोजी लेखी परीक्षा
घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमीत करण्यात आले आहे.
ज्या पात्र उमेदवारांना 6 एप्रिल 2012 पर्यंत प्रवेशपत्र न मिळाल्यास
त्यांनी 7 एप्रिल 2012 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी
कार्यालयातील एनआयसी कक्षात संपर्क साधून प्रवेशपत्राची दुसरी प्रत हस्तगत
करावी. पात्र – अपात्र उमेदवारांची यादी परभणी जिल्हा वेबसाईटवर
http:/parbhani.gov.in पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच सदर यादी जिल्हाधिकारी
कार्यालयातील नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.००००००००००००
मध्यम प्रकल्पात 28 तर लघु प्रकल्पात 18 टक्के पाणीसाठा परभणी, दि.
27 : जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात 14.560 दलघमी तर लघु प्रकल्पात 07.476
दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात 2 मध्यम तर 22 लघु असे
एकूण 24 प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता 25.420 असून
यापैकी मध्यम प्रकल्पात 14.560 दलघमी पाणीसाठी उपलब्ध आहे. ही टक्केवारी
28 आहे. तर लघु प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता 8.658 असून यापैकी 07.467 दलघमी
पाणीसाठा उपलब्ध आहे. ही टक्केवारी 18
आहे. 000000000
///////////////////////////////////////////
महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती
परभणी, दि. 26 – परभणी शहर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम दि. 20 मार्च
2012 पासून सुरू झाला असून सदर निवडणूक कामाकरीता पाच निवडणूक निर्णय
अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर
यांच्याकडे प्रभाग क्रमांक 09, 10, 18, 19, 20, 27, 28, उपजिल्हाधिकारी
(रोहयो) ब्रिजेश पाटील यांच्याकडे 3, 4, 5, 6, 21, 22, 23, उपजिल्हाधिकारी
(पुनर्वसन) डॉ.प्रताप काळे यांच्याकडे 1, 2, 7, 8, 11, 12, उपजिल्हाधिकारी
(निवडणूक) स्वाती कारले यांच्याकडे 24, 25, 26, 30, 31, 32, तर
उपजिल्हाधिकारी (सामान्य) शोभा राऊत यांच्याकडे प्रभाग क्रमांक 13, 14, 15,
16, 17, 29 ची जबाबदारी सोपिविण्यात आली आहे. सदर अधिका-यांच्या कार्यालयात
संबंधित निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने
कळविले आहे. ००००००००००
कायदेविषयक माहिती शिबिर घेण्यासाठी अर्ज आमंत्रित
परभणी, दि. 26 – परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये कायदेविषयक जनजागृती
करण्याच्या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणा-या अशासकीय नोंदणीकृत संस्थांकडून
अर्ज मागविण्यात येत आहे. सदर संस्थांनी 16 एप्रिल 2012 पर्यंत अर्ज सादर
करावे. तसेचअधिक माहितीकरीता अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.
///////////////////////////////////////////
लेख--सर्वेक्षणाचा राष्ट्रीय कार्यक्रम
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास
मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यात सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण
करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यातील सर्वेक्षणाचा शुभारंभ राज्याचे महसूल
राज्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या
हस्ते झाला. पाथरी तालुक्यातील रेणापूर येथे झालेल्या या कार्यक्रमास
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई बुधवंत, उपाध्यक्ष समशेर वरपूडकर,
बाबाजानी दुर्रानी, विजय भांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी.
मित्रगोत्री हे उपस्थित होते. बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगाने
समाजातील तळागाळातील घटकांसाठी असलेल्या विकास योजनांचा लाभ त्यांनाच
मिळावा, इतरांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये, यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत
आहे.
परभणी जिल्ह्यात या सर्वेक्षणासाठी 3 हजार 382 प्रगणक गट तयार करण्यात आले
असून त्यासाठी 853 प्रगणक व 146 पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली
आहे. या प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
हे सर्वेक्षण ग्रामीण व शहरी भागात एकाच वेळी करण्यात येणार आहे. या
सर्वेक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्वेक्षण कागदविरहीत (पेपरलेस) असून
कुटुंबप्रमुख जी माहिती देणार आहे ती टॅबलेट पी.सीवर ( छोटा संगणक)
भरण्यात येणार आहे. या साठी प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून अधिकारी व
कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी एन.पी. मित्रगोत्री यांनी
दिली.
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. विविध जाती, धर्म आणि
पंथाचे लोक या देशात गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना दिसतात. तथापि, देशातील
विविध जाती-धर्मातील लोकांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे.
समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी व्हावी, सर्वांना सामाजिक न्याय मिळावा
यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात.
ज्यांना या योजनांचा लाभ मिळाला, त्यांची आर्थिक प्रगती झाली तथापि हे
प्रमाण म्हणावे तसे वाढलेले नाही. अज्ञानाअभावी किंवा माहितीच्या अभावी
विविध जाती, धर्माचे लोक आजही शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. त्यांची
आर्थिक स्थिती सुधारावी त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून
घेण्यासाठी हे सर्वेक्षण उपयोगी ठरेल. समाजातील तळागाळातील घटकांसाठी विशेष
करुन असलेल्या विकास योजना व कार्यक्रमांचा फायदा त्यांनाच मिळावा आणि इतरांनी
त्याचा गैरफायदा घेवू नये यासाठी केंद्र शासनाने सामाजिक, आर्थिक व जात निहाय
सर्व्हेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. यापूर्वी सन 2002 मध्ये याबाबतचे
सर्व्हेक्षण करण्यात आले होते.
घरोघरी जाऊन सामाजिक व आर्थिक गणना करण्यात येणार असल्यामुळे
कुटूंबाची सामाजिक, आर्थिक स्थितीच्या आधारावर त्याचा दर्जा काय आहे ही माहिती
मिळेल, त्यामुळे शासनाला दारिद्रयरेषेखाली राहत असलेल्या कुटूंबाची यादी तयार
करण्यास मदत होणार आहे. कुटूंबाच्या खऱ्या स्थितीविषयी माहिती उपलब्ध होणार
असल्यामुळे जातीनिहाय लोकसंख्येची गणना करता येईल. विविध धर्माची
सामाजिक-आर्थिक स्थिती तसेच शैक्षणिक स्थितीविषयी प्रत्यक्षात असलेली माहिती
या सर्व्हेक्षणातून मिळणार आहे. हे सर्व्हेक्षण पूर्णत: संगणक प्रणालीवर
होणार आहे. केंद्र शासनाच्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमीटेड अर्थात भेलने
सर्व्हेक्षणासाठी तयार केलेल्या विशेष यंत्राचा वापर यासाठी करण्यात येणार आहे.
परभणी जिल्हास्तरावर सर्व्हेक्षणाचे संनियंत्रण, समन्वय आणि
व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे यांच्या
अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमध्ये मुख्य कार्यकारी
अधिकारी एन.पी. मित्रगोत्री, पोलीस अधीक्षक मैथीली झा, जिल्हा उपनिबंधक
एस.पी. बडे हे सदस्य तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक
पद्माकर केंद्रे हे सदस्य सचिव आहेत.
या सर्व्हेक्षणाचे काम हे ज्या पध्दतीने जनगणना करण्यात आली त्या
पध्दतीने होणार आहे. प्रगणकाकडून संबंधित कुटुंबाची माहिती संगणकावर नोंदविली
गेल्यानंतर संबंधित कुटुंबाला तेथेच पावती सुध्दा देण्यात येणार आहे. एका
प्रगणकाला 4 प्रगणक गटाचे सर्वेक्षण 40 दिवसात पूर्ण करावयाचे आहे. 10 दिवसात
एक प्रगणक गटाचे म्हणजेच 40 दिवसात 4 प्रगणकाचे सर्वेक्षण पूर्ण
करावयाचेआहे. एका प्रगणकाला साधारणत: 400 ते 600 घरांचे व 2 ते 3 हजार
व्यक्तींचे सर्व्हेक्षण करावे लागणार आहे. हे सर्व्हेक्षण जास्तीत जास्त 40
दिवसापर्यंत दररोज एका प्रगणकाला 15 ते 20 घरांचे व त्यातील 75 ते 100
व्यक्तींचे सर्व्हेक्षण पूर्ण करावे लागेल. प्रगणकाची निवड करताना शिक्षणाचा
हक्क कायद्यानुसार प्राथमिक शाळेतील शिक्षक वगळता तलाठी, ग्रामसेवक, इतर
वरिष्ठ वर्गाचे शिक्षक व शिक्षकेतर प्रशासकीय कर्मचारी, कृषी सहायक, मुख्य
सेविका, विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांमध्ये लावण्यात आलेले वर्ग-3
पेक्षा व त्यावरील समकक्ष असे कंत्राटी कर्मचारी यांना या कामासाठी
नेमण्यात आले आहे.
सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्व्हेक्षण कसे करावे याबाबत
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सामाजिक व आर्थिक
सर्व्हेक्षणाबरोबरच या सर्व्हेक्षणातच सर्व नागरिकांची जात व धर्म याची नोंदणी
करण्यात येईल. मात्र जात आणि धर्माची संकलित केलेली माहिती जनतेसाठी उघड केली
जाणार नसून त्याचा उपयोग रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्यासाठी होणार आहे.
जिल्हास्तरावरुन सर्व्हेक्षण योग्य पध्दतीने झाले आहे किंवा नाही हे
बघण्यासाठी तसेच चार्ज ऑफीसरच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर
वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबाचे सर्व्हेक्षण सुरळीतपणे
पार पडावे व त्यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी शासनाच्या विविध
यंत्रणांचे सहकार्य घेण्यात आले आहे. तालुकापातळीवर गटविकास अधिकारी हे
संबंधित तालुक्यासाठी तर नगर परिषद क्षेत्रासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे
चार्ज ऑफीसर असतील.
बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या अनुषंगाने समाजातील तळागाळातील
घटकांसाठी विशेषत्वाने असलेल्या विकास योजना व कार्यक्रमाचा फायदा त्यांनाच
मिळावा व इतरांनी त्याचा गैरफायदा घेवू नये यासाठी सामाजिक, आर्थिक व जात
सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. हे सर्व्हेक्षण ग्रामीण आणि शहरी भागात एकाचवेळी
करण्यात येणार आहे. सदरील सर्वेक्षण हे अतिशय महत्त्वाचे असून भारताची अर्थ
व्यवस्था, सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे.
सदरील सर्वेक्षणाच्यावेळी संबंधित कुटुंबपप्रमुखांनी वस्तूनिष्ठ माहिती
दिली पाहिजे, तसेच कोणतेही कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याची
काळजी घेतली सर्वेक्षण यंत्रणेने घेतली पाहिजे. म्हणूनच सर्व्हेक्षणाच्या
राष्ट्रीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय, निमशासकीय यंत्रणा
आणि लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
राजेंद्र सरग,जिल्हा माहिती अधिकारी,परभणी
///////////////////////////////////////////
सर्वेक्षणाचे काम अचूकतेने व्हावे- पालकमंत्री
पाथरी- सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण हे अतिशय महत्त्वाचे असून भारतीय
अर्थ व्यवस्था, सामाजिक व्यवस्था व राजकीय व्यवस्थेवर दूरगामी परिणाम
करणारे आहे. त्यामुळे हे सर्वेक्षणाचे काम अतिशय प्रामाणिकपणे व अचूकतेने
करण्याच्या सूचना राज्याचे महसूल राज्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे
पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिल्या. पाथरी तालुक्यातील
रेणापूर येथे सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण कामाचा शुभारंभ करतांना
पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा मीनाताई केशवराव बुधवंत तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे
उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, बाबाजानी दुर्रानी, विजय भांबळे, जगन्नाथ जाधव,
अशोक काकडे, अर्चना पाटील, शंतनू पाटील, उत्तमराव जाधव, पुंजारे गुरुजी,
दादासाहेब टेंगसे, प्रताप सोळंके, गणेशराव रोकडे, सुभाष कोल्हे, एडव्होकेट
रामेश्वर शेवाळे, मदनराव भोसले, प्रसाद बुधवंत, बालासाहेब वाघमारे, रामेश्वर
जावळे, दीपक जाधव आदी उपस्थित होते. बाराव्या पंचवार्षिक
योजनेच्या अनुषंगाने समाजातील तळागाळातील घटकासाठी असलेल्या विकास योजनांचा
त्यांनाच मिळावा, इतरांनी त्या योजनांचा गैरफायदा घेऊ नये, यासाठी हे
सर्वेक्षण होणार असल्याचे पालकमंत्री श्री. सोळंके यांनी सांगितले.
सर्वेक्षणाचे काम अचूकपणे होईल ही केवळ संबंधित कर्मचा-यांची जबाबदारी नसून
आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी. मित्रगोत्री यांनी
केले. ते म्हणाले, परभणी जिल्ह्यात या सर्वेक्षणासाठी 3 हजार 382 प्रगणक गट
तयार करण्यात आले असून त्यासाठी 853 प्रगणक व 146 पर्यवेक्षक यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणाची माहिती टॅबलेट पी.सीवर ( छोटा
संगणक) भरण्यात येणार आहे. कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षा मीनाताई केशवराव बुधवंत, उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, बाबाजानी
दुर्रानी, विजय भांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत
एन.पी. मित्रगोत्री व पी.टी. केंद्रे यांनी केले. कार्यक्रमानंतर पालकमंत्री
श्री. सोळंके यांच्या उपस्थितीत सुदाम आबासाहेब बोराडे यांच्या
निवासस्थानी जाऊन सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
///////////////////////////////////////////
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील अध्यक्ष/सदस्याकरीता अर्ज भरण्याची अंतिम
तारीख 25 एप्रिल
परभणी, दि.22 : राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील
अध्यक्ष, शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्याकरीता अर्ज भरण्याची अंतिम
तारीख 25 एप्रिल 2012 आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीकरीता जिल्हा
ग्राहक तक्रार निवारण मंच, परभणी येथे त्वरीत संपर्क करावा, असे जिल्हा
ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रबंधक टी. एस. अटकोरे यांनी कळविले आहे.
///////////////////////////////////////////
जिल्ह्यात परीक्षा सुरळीत सुरू
परभणी, दि.22 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2012 ला 1
मार्च पासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 75 परीक्षा केंद्रावर सुरळीत
परीक्षा सुरू आहे. दिनांक 21 मार्च 2012 रोजी दहावीच्या सकाळच्या सत्रात
झालेल्या सामाजिक शास्त्रे भाग-1 व इयत्ता 12 वीच्या सकाळच्या सत्रात
भुगर्भशास्त्र या विषयाची परीक्षा शांततेत व सुरळीतपणे पार पडली. या
पेपरदरम्यान कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी करणे वा अन्य प्रकार आढळून न
आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले
आहे. 0000000
पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जागेकरीता 12 मे रोजी प्रवेश परीक्षा
परभणी, दि.22 : भारतीय पशुवैद्यक परिषदेमार्फत घेतल्या जाणा-या अखिल भारतीय
स्तरावरील पशुवैद्यक महाविद्यालयातील 15 टक्के जागेकरीता दिनांक 12 मे 2012
रोजी दुपारी 2 ते 5 या वेळात विविध केंद्रावर परीक्षा होणार आहे, असे
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी यांनी कळविले आहे.
///////////////////////////////////////////
क्षयरोग हमखास बरा होतो
24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सुधारित
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डॉट्स प्लस उपचार प्रणालीची
सुरुवात 14 फेब्रुवारी 2011 पासून करण्यात आली आहे. या उपचार पध्दतीमध्ये
बहुविध औषधोपचार प्रतिकारत्मकता (मल्टी ड्रग रेजिस्टन्स टीबी) असलेल्या
क्षयरोग्यांना डॉट्स प्लस उपचार प्रणाली देण्यात येते. एमडीआर-टीबी चे
निदान नागपूर येथील शासनमान्य प्रयोगशाळेत बेडका (थुंकी) तपासून केले जाते.
यामध्ये मायक्रोबॅक्टेरियम टीबीचे कल्चर व सेन्सिटीव्हीटी तपासणी केली
जाते. या डॉट्स प्लस उपचार प्रणालीचा कालावधी 24 ते 27 महिने इतका असतो.
यामध्ये सहा-सात प्रकारची विविध औषधे असतात. पहिल्या 6 महिन्यात इंजेक्शन
(कॅनामायसिन) दिल्या जाते. डॉट्स प्लस उपचारांतर्गत असलेल्या
रुग्णांच्या वेळोवेळी उपचारा दरम्यान थुंकीचे कल्चर केल्या जाते,
त्यामुळे रोगाची अवस्था कोणत्या पातळीवर आहे, हे लक्षात येते.
अवस्थेनुसार औषधोपचारात बदल व उपचाराचा कालावधी ठरविण्यात येतो. डॉट्स प्लस
उपचार प्रणाली ही अत्यंत खर्चिक असून त्यामध्ये महागडी औषधी वापरली जाते.
तथापि, ही उपचार पध्दती शासनातर्फे पूर्णपणे मोफत दिली जाते.
डॉट्स व डॉट्स प्लस उपचार प्रणालीमुळे कोणत्याही प्रकारचा व कोणत्याही
अवस्थेतील क्षयरोग आता पूर्णपणे व हमखास बरा होतो. क्षयरोगावर मात
करण्यासाठी क्षयरुग्णांनी व इतरांनी काही गोष्टी लक्षात ठेवून आचरणात
आणाव्यात. दोन आठवड्यांपेक्षा जास्त मुदतीचा खोकला असणा-या रुग्णांनी
त्वरित थुंकी (बेडका) तपासणी करुन घ्यावी. क्षयरोगाचे निदान झाल्यास
डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणाखाली औषधोपचार
करुन घ्यावा. शिंकतांना व खोकतांना तोंडावर रुमाल ठेवावा. सार्वजनिक ठिकाणी
थुंकू नये. समतोल आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, तंबाखू, गुटखा आदी
मादक पदार्थांचे सेवन तसेच धूम्रपान टाळावे. काही दिवस औषधी
घेतल्यास बरे होण्याची भावना क्षयरुग्णांमध्ये होते. मात्र संपूर्ण
कालावधीचा औषधोपचार घेतला तरच रोग निश्चितच बरा होतो. रोग बरा झाल्याची
भावना म्हणजे औषधोपचार लागू पडत असल्याची लक्षणे असतात. मध्येच औषधोपचार
सोडल्यास किंवा बंद केल्यास रोग पुन्हा बळावतो. अशा परिस्थितीत मूळची औषधी
लागू पडतीलच याची खात्री देता येत नाही. नियमित व संपूर्ण कालावधीच्या
औषधोपचाराने कोणत्याही अवस्थेचा व स्तरावरील क्षयरोग बरा होतो. आपला रोग
बरा झाला आहे असे रुग्णांनी स्वत:च ठरवू नये. डॉक्टर किंवा आरोग्य
कर्मचारी यांच्या सल्ल्यानुसार थुंकी (बेडका) तपासणी करुन घ्यावी. या
तपासणीवरुन तपासणीवरुन रोगाची अवस्था कोणत्या पातळीवर आहे व पुढील औषधोपचार
काय करावा, हे ठरविणे डॉक्टरांना सोपे जाते. यामुळे रोग लवकर व निश्चितचपणे
बरा होण्यास खूप मोठी मदत होते. एखाद्या व्यक्तीस क्षयरोग
झाल्याचे आढळून आल्यास त्याच्या सहवासात असलेल्या सर्व कुटुंबियांनी
तपासणी करुन घेतली पाहिजे. कुटुंबात 6 वर्षाखालील मुले असतील तर अधिक काळजी
घेतली पाहिजे. बाळ जन्मल्यानंतर लगेच बाळाला बीसीजीची लस दिली पाहिजे.
त्यामुळे मेंदूचा क्षयरोग या सारख्या घातक रोगापासून बाळाचे संरक्षण होते.
क्षयरुग्ण मातेस स्तनपान करण्यास काहीच हरकत नसते. मात्र तिच्या थुंकीत
जंतू आढळल्यास तिच्या बाळाला प्रतिबंधात्मक-निदानात्मक औषधोपचार करुन घेणे
आवश्यक असते. भारत सरकारचे क्षयरोग नियंत्रणासाठी युध्दपातळीवर
प्रयत्न चालू आहेत. डॉट्स प्लस उपचार प्रणालीत पूर्णपणे मोफत तपासणी व पूर्ण
कालावधीसाठी मोफत उपचार सर्व शासकीय रुग्णालयात केल्या जात असल्याची माहिती
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एम.एस. बायस यांनी दिली. क्षयरोग हा सार्वजनिक
आरोग्य सेवेतील गंभीर प्रश्न आहे. क्षयरोग्याच्या समस्या लोकांना
समजाव्या, क्षयरोगाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व जनतेने सक्षम व्हावे यासाठी
दरवर्षी 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. 1882 साली
याच दिवशी डॉ. रॉबर्ट कॉक या जर्मन शास्त्रज्ञाने क्षयरोग हा अनुवंशिक नसून
तो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्यूलॉसिस या जीवाणूमुळे होत असल्याचा शोध
लावला. क्षयरोग असाध्य नाही, तसेच तो दैवी शापामुळेही होत नसल्याचे त्याने
सिद्ध केले. क्षयरोग हा शरीराचे नख व केस वगळता इतर कुठल्याही अवयवाचा उदा.
मज्जासंस्थेचा, हाडांचा, सांध्याचा, आतड्याचा, लसिका ग्रंथींचा, जनन व
विसर्जन संस्थेचा होऊ शकतो. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. फुफ्फुसाचा
क्षयरोगी जेव्हा खोकतो, शिंकतो, थुंकतो किंवा मोठ्याने बोलतो त्यावेळी
त्याच्या शरीरातील क्षयरोगाचे जीवाणू बाहेर पडून हवेत पसरतात. हवेत तरंगत
असलेले क्षयरोगांचे जीवाणू निरोगी माणसाच्या श्वासाबरोबर त्याच्या
शरीरात प्रवेश करतात व त्याला क्षयरोगाचा संसर्ग होतो. क्षयरोगाचे निदान
झाल्यास योग्य ते औषधोपचार घेतल्यास हा रोग निश्चितच बरा होतो.
राजेंद्र सरग,जिल्हा माहिती अधिकारी,परभणी
///////////////////////////////////////////
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक संपन्न
परभणी, दि. 20 : जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी
बी.बी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जे.
एस. तांबारे, निवासी उप जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा उप निबंधक
शिवाजी बडे, के.बी. शिंदे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, उप कार्यकारी
अभियंता डी.बी. चिद्रेवार, एच.एन. देशमुख, आर.जी. जुकटे, एम.व्ही. कोंगुट्टे
आदी उपस्थित होते. बैठकीत प्राप्त झालेल्या तक्रारींवर चर्चा करुन
संबंधितांना त्या बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी बी. बी.
चव्हाण यांनी दिले.0000000
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
परभणी, दि. 20 : अनुसूचित जाती –जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या
जनजागृतीसाठी समाज कल्याण विभागाने पुढे आले पाहिजे, अशा सूचना अपर
जिल्हाधिकारी बी.बी. चव्हाण यांनी दिल्या. जिल्हा दक्षता व नियंत्रण
समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत
होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जे. एस. तांबारे, निवासी उप जिल्हाधिकारी
विश्वंभर गावंडे, ज्येष्ठ विधीज्ञ विजयराव देशमुख, अ.ना. गोडबोले, सहायक
आयुक्त उमेश सोनवणे आदी उपस्थित होते. बैठकीत अनुसूचित जाती –जमाती
अत्याचार प्रतिबंधक कायदा, नागरी हक्क संरक्षण कायद्याखाली दाखल झालेल्या
गुन्ह्यांचा तसेच न्यायप्रविष्ट झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात
आला. 0000000
जमिनीचा जाहीर लिलाव परभणी, दि. 20 : श्री देवी मठ संस्थान पिंपरी झोला
न्यासाच्या जमिनी ठोक्याने देण्याकरीता जाहीर लिलाव 26 मार्च ते 29 मार्च
2012 या कालावधीत करण्यात येणार आहे. इच्छुकांनी मौ. पिंपरी झोला येथील
देवीच्या मठात उपस्थित राहावे, असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या
अधिक्षकांनी कळविले आहे. 0000000000
रोजगार व स्वंयरोजगार विभागाची सेवा महा ई - सेवा केंद्राच्या माध्यमातून
उपलब्ध परभणी, दि. 20 : रोजगार व स्वंयरोजगार विभागाच्या रोजगार विषयक
सेवांचे विकेंद्रीकरण करुन या सेवा महा ई - सेवा केंद्रातून देण्याच्या
निर्णयास शासनाने मान्यता दिलेली आहे. दिनांक 3 जानेवारी 2012 पासून परभणी
जिल्ह्यातील सर्व महा ई- सेवा केंद्राकडून, शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये आदी मार्फत नाममात्र शुल्क
आकारुन रोजगार व स्वंयरोजगार विभागाची सर्वसेवा उपलब्ध करुन दिलेली आहे.
तालुक्याच्या ठिकाणी ही सेवा दररोज उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उमेदवारांनी महा ई – सेवा केंद्र, जवळच्या ठिकाणचे औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, तंत्रनिकेतन आदींचा उपयोग घ्यावा. अधिक माहितीकरीता जिल्हा रोजगार
व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्याशी 02452-220074 या
क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
///////////////////////////////////////////
जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन
परभणी, दि. 19 : परभणी शहर महानगर पालिका निवडणूक - 2012 अंतर्गत
मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव प्रभागात निवडणूक लढवू इच्छिणा-या
उमेदवारांची जात प्रमाणपत्र पडताळणी करीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीकडे एकूण 388 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सदर प्रस्तावांची पडताळणी
समितीच्या कार्यालयात चालू झालेली आहे. जात प्रताणपत्र पडताळणी प्रस्ताव
दाखल केलेल्या उमेदवारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,
जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे संपर्क साधून आपला प्रस्ताव वेळेत वैध
होईल यासाठी त्रृटींची पूर्तता विहित वेळेत सादर करावी, असे आवाहन करण्यात
आले आहे. प्रस्तावातील त्रृटींची यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात
आलेली आहे. तसेच शासन आदेशानुसार नगर परिषद, जिल्हा परिषद / पंचायत समिती
निवडणूक 2012 अंतर्गत वैधता झालेल्या प्रमाणपत्रावर 'निवडणुकीच्या
कामाव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी वापरता येणार नाही,' अशा प्रकारचा शिक्का
मारून घेऊन जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत परभणी महानगर
पालिका निवडणुकीकरीता जात वैधता प्रमाणपत्र मिळणा-या उमेदवारांना सदर
प्रमाणपत्र 'परभणी महानगर पालिका निवडणुकी' व्यतिरिक्त इतरत्र उपयोगी पडणार
नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण
यांनी कळविले आहे.
///////////////////////////////////////////
जिल्हाधिका-यांच्या हस्ते माजी सैनिक/विधवांना धनादेश वाटप
परभणी, दि.16 : महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या शौर्यपदकधारकांच्या
विधवांना तसेच दुस-या महायुध्दात भाग घेतलेल्या माजी सैनिक, वीरपत्नी यांना
जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे यांच्या हस्ते वाढीव धनादेशाचे वाटप
करण्यात आले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे,
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल समीर राऊत, औरंगाबादचे सैन्य भरती
अधिकारी पी. अशोक उपस्थित होते. यावेळी एकूण 22 जणांना वाढीव धनादेशाचे वाटप
करण्यात आले. ********वृत्त क्रमांक: 180न्या. पी.बी. गायकवाड
यांचा दौरापरभणी, दि.16 : राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती पी. बी. गायकवाड
हे 19 मार्च ते 21 मार्च 2012 या कालावधित नांदेड जिल्ह्याच्या दौ-यावर येत
आहेत. यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात
दिनांक 19 व 20 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तर दिनांक 21
मार्च 2012 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ते लातूर, परभणी व हिंगोली
जिल्ह्यातील प्रशासनाविरुध्द किंवा शासकीय कर्मचा-यांविरुध्द काही तक्रारी
असल्यास स्वीकारणार आहेत, असे कळविण्यात आले आहे. *********वृत्त क्रमांक:
18120 मार्च रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठकपरभणी, दि.16 :
जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक दिनांक 20 मार्च 2012 रोजी सकाळी
11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात काही
तक्रारी असल्यास त्या पुराव्यानिशी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा
भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या नावाने वरील दिनांकास दाखल करता येतील,
असे कळविण्यात आले आहे.
00000000000वृत्त क्रमांक: 182जिल्हास्तरीय खाजगी दूरचित्रवाणी सनियंत्रण
समिती गठीत परभणी, दि.16 : खाजगी दूरचित्रवाहिन्यांसाठी जिल्हास्तरीय
सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे
हे या समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग हे
सदस्य सचिव आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मैथिली झा या समितीचे शासकीय सदस्या
असून अशासकीय सदस्यांमध्ये प्रा. वनिता उदगीरकर, सूर्यकांत कुलकर्णी आणि के.
के. पाटील यांचा समावेश आहे. 00000000
///////////////////////////////////////////
लोकशाही दिनात 65 तक्रारी दाखल
परभणी, दि. 5 : जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या लोकशाही
दिनात 65 तक्रारी दाखल करण्यात आल्या. यात सर्वाधिक तक्रारी महसूल विभागाशी
संबंधित असून या तक्रारींची संख्या 26 आहे. यानंतर जिल्हा परिषद 14, महानगर
पालिका व नगर पालिका 11, जिल्हा शल्य चिकित्सक 3, पोलीस अधीक्षक 2, इतर
विभागाशी संबंधित 9 अशा एकूण 65 तक्रारी दाखल करण्यात आल्या.
सदर बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, अपर पोलीस अधीक्षक जे. एस.
तांबारे, मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, कार्यकारी अभियंता
जी. एस. खाडे, विभाग नियंत्रक ए. एल. कर्वे उपस्थित होते. सदर तक्रारी
संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर एक महिन्याचे आत निर्णय घेण्याबाबत
संबंधित विभाग प्रमुखांना कळविण्यात आले
आहे. 0000000
होळी शांततेत पार
पाडा
-अपर जिल्हाधिकारी चव्हाण परभणी, दि. 5 : येत्या दोन-तीन दिवसांत
होळी, धूळवड व शिवजयंती उत्सव साजरे करण्यात येणार असून नागरिकांनी हे सण
शांततेत पार पाडावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी बी. बी. चव्हाण यांनी
केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत
ते बोलत होते. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक जे. एस. तांबारे, निवासी
उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप डोईफोडे,
सेलूचे उपविभागीय अधिकारी सुनील यादव उपस्थित होते. होळीला नैसर्गिक रंगाचा
वापर करावा तसेच इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच
सणानिमित्त सर्व अधिकारी आणि विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार
पाडावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. बैठकीला शांतता
समितीचे सदस्य उपस्थित
होते. 0000000000
9 मार्च रोजी जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक परभणी, दि. 5 :
जिल्हा वार्षिक योजना सन 2011-12 अंतर्गत भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा
घेण्यासाठी दिनांक 9 मार्च 2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले
आहे. 0000000000
पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड
प्रक्रिया 14 मार्च रोजी परभणी, दि. 5 : जिल्ह्यातील पंचायत समिती
सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया संबंधित पंचायत समिती कार्यालयात
14 मार्च 2012 रोजी होणार आहे. संबंधित पंचायत समिती सभागृहात सदर निवडणुकीचे
नामनिर्देशन पत्र सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील.
दुपारी 2 वाजता सभापती, उपसभापती पदाची निवड करण्यात येईल. तसेच
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया 21 मार्च 2012
रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम
वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष व
उपाध्यक्षाची निवड करण्यात येईल. तत्पूर्वी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी
नामनिर्देशन पत्र सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे
कळविण्यात आले आहे.
000000000
////////////////////////////////////////
///////////////////////////////////////////
परिवर्तनाचे वारे
परभणी जिल्ह्यातील खांबेगावच्या महिला बचतगटानं पाणीपट्टी वसुलीचा उपक्रम
यशस्वीपणं राबविला. या उपक्रमाचं राज्यस्तरावर कौतुक झालं. महाराष्ट्र
शासनानं पाणीपट्टी वसुली महिला बचतगटाकडं देण्याचा निर्णय घेऊन त्यावर
शिक्कामोर्तब केलं. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील मुळी या गावातील महिला
बचतगटानं पाणीपट्टी वसुलीचा आदर्श निर्माण केलाय. मुळी हे गाव
गंगाखेडपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे. महिला आर्थिक विकास
महामंडळाच्या बचतगट चळवळीमुळं या गांवांत परिवर्तनाचं वारं वाहत आहे. या
विषयी सांगत आहेत परिवर्तन गाव समितीच्या अध्यक्षा वंदना भोसले. त्या
म्हणाल्या, साधारण 2005-2006 ची गोष्ट. आमच्या गावात माविमंच्या
सहयोगीनी आल्या. त्यांनी बचतगटाविषयी माहिती दिली. महिलांनी एकत्र यायचं,
दरमहा पैसे गोळा करायचे, एकमेकींना कर्ज म्हणून द्यायचे. असं बरंच काही
सांगितलं. आम्हाला बचतगटाविषयी काही रस वाटत नव्हता. पण नियमित एकत्र
येण्यामुळं, चर्चेमुळं बचतगटाच्या चळवळीविषयी आपुलकी निर्माण झाली. आम्ही
27 जानेवारी 2006 ला सरस्वती महिला बचतगट स्थापन केला. 12 जणी सभासद
होत्या. नियमित बचत करु लागलो. तशी मला नेतृत्व करण्याची आवड होतीच.
बचतगटाच्या रुपानं मला संधी मिळाली. एकमेकींच्या सहकार्यानं गावात 18 गट
तयार केले. महिलांनी परिवर्तन गावस्तरीय समितीची अध्यक्षा म्हणून माझ्यावर
जबाबदारी टाकली. या समितीच्या माध्यमातून आम्ही संत गाडगेबाबा ग्राम
स्वच्छता अभियान राबविलं. समितीतील सदस्य व इतर अनुभवी महिलांच्या
सहकार्यानं हे अभियान यशस्वी झालं. गावाला आमच्या कामाची ओळख झाली. सन 2008
च्या दरम्यान जलस्वराज्य प्रकल्पातून गाव बाहेर पडण्याच्या
मनस्थितीत होतं. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल चांगली
होण्याच्या दृष्टीनं जबाबदारी कुणाला द्यायची याविषयी सरपंचांनी गटातील
महिलांसोबत चर्चा केली. खांबेगाव पॅटर्ननुसार महाराष्ट्र शासनानं पाणीपट्टी
वसुली महिला बचतगटाकडं देण्याचा निर्णय घेतला होताच. त्यानुसार पाणी पुरवठा
व प्रकल्प देखभाल दुरुस्तीचं काम आमच्या परिवर्तन गाव समितीनं
स्वीकारावं, असा निर्णय सर्व महिलांच्या साक्षीनं झाला. मे 2008
मध्ये प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीचं काम तर मिळालं. पण अनेक अडचणी
उभ्या राहिल्या. गावकरी नळपट्टी भरत नव्हते, परंतु नळाला पाणी आलं नाही तर
भांडायला यायचे. अशा भांडणांमुळं जीव वैतागून जायचा. कुठून हे काम
स्वीकारलं, असं वाटायचं. पण आम्ही धीर सोडला नाही. बचतगटामुळं
परिस्थितीवर मात करायचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. गावातील 3
वॉर्डामध्ये 3 गावसमिती सदस्यांवर पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी टाकली. ही
जबाबदारी पार पाडतांनाच पाणी पुरवठा करतांना येणा-या अडचणी जाणून त्या दूर
करण्यास सांगितलं. 1 नंबर वॉर्डात मी, दोन नंबर वॉर्डात मैदाबी सय्यद अन्
3 नंबर वॉर्डात गोदावरी हनवते अशा आम्ही तिघींनी कामास प्रारंभ केला. नळावर
महिला पाणी भरतात, परंतु पाणीपट्टी पुरुषांकडं मागावी लागते. हा विरोधाभास
लक्षात आला. यावर उपाय म्हणून नळ कनेक्शन महिलांच्या नांवावर करण्याचा
धोरणात्मक निर्णय घेतला. ग्रामपंचायतीनं सहकार्य केलं. महिलांच्या नावावर
नळ असल्यानं नळपट्टी महिलांकडंच मागण्यात येऊ लागली. आपण घरासाठीच पाणी
भरतो, मग दर दिवसाला दीड रुपयाप्रमाणं महिन्याला 45 रुपये देणं अवघड नाही,
अशा शब्दात त्यांना साद घातली. घरोघरी जाऊन पाणीपट्टी वसुलीचं महत्त्व
पटवून देण्यात आलं. पैसे देणा-या महिलेला लगेच पावती दिली जायची. पैसे
नसतील तर पुढच्या महिन्यात भरण्याची सवलत दिली जायची. महिलांची मानसिकता
बदलवण्याच्या कामात पद्मिनीबाई भोसले यांचीही खूप मदत झाली.
आमच्या समितीमार्फत गावात नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. सर्व वॉर्डात एकाच
वेळी पाणी सोडणे शक्य नसल्यानं एका वॉर्डात सायंकाळी पाणी सोडलं जातं.
महिला नळपट्टी नियमित भरत असून 1 लक्ष 61 हजार 910 रुपये वसुली झालेली आहे.
आज गावात 375 नळ कनेक्शन्स आहेत. या कामातून पाणी पुरवठा करणारी व्यक्ती
तसंच विद्युत पंपाचं वीज बिल व दुरुस्ती यासाठी मिळकतीचा 80 टक्के भाग
गावसमितीकडं वेगळा ठेवलेला आहे. पाणीपट्टी वसुलीच्या 2 टक्के रक्कम आम्हा
तिघींना मिळत आहे. त्याचबरोबर गावसमितीस व ग्रामपंचायतीस प्रत्येकी 10
टक्के रक्कम देण्याचे ठरवलं आहे. पाण्यासाठी महिलेलाच कष्ट करावे
लागतात. आज आम्ही प्रत्येक घरात सुरळीत पाणीपुरवठा सुरु करुन आमच्या
बहिणींचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केलाय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
राजेंद्र सरगजिल्हा माहिती अधिकारी,परभणी
///////////////////////////////////////////
महिलांनी केली मत्स्यशेती
परभणी-ताडकळस रस्त्यावर लिमला गावापासून 5 किलोमीटर आत वसलेलं
वझूर गाव. गावातील महिलांचं विश्व म्हणजे चूल आणि मूल. महिलांमध्ये
आत्मशक्ती वाढविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीनं (माविम)
प्रयत्न सुरु झाले. या प्रयत्नांना यश आलं. या गावातील महिलांनी आपला
मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय भरभराटीस आणला. आर्थिक उन्नतीबरोबरच सामाजिक
उपक्रमातही इथल्या महिला अग्रेसर आहेत. माविमच्या या प्रयत्नांविषयी
सांगत आहेत, माविमच्या ताडकळस इथल्या सहयोगीनी कविता काळे.
गावामध्ये महिला बचतगट स्थापन्याचा प्रयत्न करण्यात आला. बचतगटाची चळवळ,
तिची गरज, फायदा पटवून देण्यात आला. पण त्यात यश आलं नाही. पहिला बचतगट सन
2007 मध्ये स्थापन झाला. महिलांमध्ये हळूहळू परिवर्तन होऊ लागलं. आज
गावात 19 महिला बचतगट आहेत. यापैकी जगदंबा व मुंबादेवी या बचतगटातील
महिलांचा पारंपरिक व्यवसाय होता मासेमारीचा. बचतगटाच्या माध्यमातून हा
व्यवसाय वाढविण्याचा निर्णय महिलांनी घेतला. बचतगटातून अंतर्गत कर्ज
घेऊन मासे पकडण्याचं मोठं जाळं घेतलं. त्यातून मासे पकडून त्या मासे
विक्री करु लागल्या. त्यामध्ये त्यांना भरपूर नफा मिळू लागल्या.
त्यानंतर त्यांनी गावाजवळील टरबूजवाडी इथं तलाव भाड्यानं घेऊन त्यामध्ये
मासेमारी करु लागल्या. पण निसर्गाची साथ न मिळाल्यानं त्यांचं नुकसान
झालं. तरी त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी गावातील मासेमारीचा व्यवसाय
सुरु ठेवला. गावातील तलाव भाडेतत्वावर घेऊन ते पावसाळ्यात मत्स्यबीज
सोडतात. आवश्यक ती काळजी घेतल्यानंतर दोन महिन्यात मासे विक्रीसाठी
तयार होतात. महिला बचतगटाच्या नियमित व्यवहारामुळं बँकेनं जगदंबा बचतगटास
1 लक्ष 20 हजार रुपये व मुंबादेवी बचतगटास 1 लक्ष 10 हजार रुपये कर्ज मंजूर
केलं. त्यातून त्यांनी प्रति महिला 10 हजार रुपये या प्रमाणं 2
बचतगटांच्या 20 महिलांनी मासे पकडण्याचं मोठ जाळं विकत घेतलं. सहा महिने
गावात व उन्हाळ्यात गावातील तळ्यात पाणी राहत नसल्यानं बाहेरगावी जाऊन
मासेमारी करतात. या मासेमारीतून मिळालेल्या नफ्यातून त्यांचा उदरनिर्वाहाचा
प्रश्न सुटला. आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणावर त्यांनी लक्ष केंद्रीत
केलंय. या महिलांनी शेतीसुद्धा विकत घेतली आहे. मासेमारी आणि शेती
व्यवसायातून त्या आर्थिक समृद्धीच्या दिशेनं वाटचाल करीत आहेत.
महिला बचतगटाच्या आर्थिक विकासाविषयी सांगत असतांनाच माविमचे जिल्हा
समन्वय अधिकारी संजय गायकवाड यांनी या महिलांच्या सामाजिक जाणीवेविषयीही
अभिमानानं सांगितलं. ते म्हणाले, या महिलांनी आर्थिक समृद्धी साधत
असतांना सामाजिक भानही जागं ठेवलं आहे. या महिलांनी एका अनाथ मुलीचं लग्न
लावून दिलं. तिला आवश्यक ते सर्व साहित्य घेऊन दिलं. बचतगटाच्या महिलाच
तिच्या नातेवाईक झाल्या आहेत. हे सर्व बचतगटामुळंच शक्य होऊ शकलं, एवढं
मात्र निश्चित.
राजेंद्र सरगजिल्हा माहिती अधिकारी,परभणी
///////////////////////////////////////////
महिलांच्या पुढाकारानं पाण्याचा प्रश्न मार्गी
परभणी-गंगाखेड मार्गावर असलेलं सायाळा हे छोटंसं गांव. गावची
लोकसंख्या सुमारे 1500. महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीनं (माविम)
गावात बचतगटाची चळवळ सुरु करण्यात आली, ते वर्ष होतं 2004. ग्रामीण भाग
असल्यानं मुलभूत सुविधांची स्थिती यथातथाच होती. महिलांमध्येही आपल्या
हक्कांची जागृती नव्हती. बचतगट स्थापन करण्यास कोणीही महिला उत्सुक
नव्हत्या, असं सायाळा मधील महिलांच्या बचतगट चळवळीविषयी वंदना परतवाघ
यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, जुलै 2004 मध्ये गौतमी महिला
स्वयंसहायता बचतगटाची स्थापना झाली. त्यानंतर हळूहळू नवनवीन महिला बचतगट
स्थापन करण्यास पुढं येऊ लागल्या. बचतगटाच्या माध्यमातून महिला एकत्र
आल्या. दरमहा केलेल्या बचतीतून एकमेकींची आर्थिक गरज भागवू लागल्या. हे
पाहून इतर महिलांनांही प्रेरणा मिळाली. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी
संजय गायकवाड म्हणाले, एके काळी महिला मंदिरासमोरुन जायला घाबरत. पण आज
त्याच महिला सामाजिक उपक्रमात उत्साहानं सहभागी होत आहेत. प्रजासत्ताक
दिन, स्वातंत्र्यदिन, ग्रामसभेस उपस्थित राहून गावाच्या विकासात योगदान देत
आहेत. माविमच्या वतीनं एकूण 7 बचतगट स्थापन झाले. 7
सप्टेंबर, 2007 ला रमाई गाव विकास समितीची स्थापना झाली. गावात महिलांचं
अस्तित्व दाखविण्यासाठी सर्वप्रथम गाव समितीच्या फलकाचं अनावरण करण्याचा
निर्णय घेण्यात आला. याच कार्यक्रमात अमोल भास्कर पंडित या अनाथ
विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी महिलांनी स्वीकारली. त्याला
शैक्षणिक साहित्य, वही, पेन व पुस्तकं देण्यात आली. 'गावसमितीच्या रुपानं
मला आई मिळाली', या शब्दांत त्यानं व्यक्त केलेली भावना अनेकांचे डोळे
पाणावून गेली. याच गावातील यमुनाबाई सूर्यवंशी या महिलेनं आपल्या पतीच्या
उपचारांसाठी राहतं घर गहाण टाकलं होतं. पतीच्या निधनानंतर तिनं हिवाळा व
उन्हाळा दुस-यांच्या अंगणात काढला. परंतु पावसाळ्यात राहण्याचा प्रश्न
उद्भवला. तिनं आपली व्यथा गाव समितीसमोर मांडली. वेळ आणि अडचण लक्षात घेऊन
महिलांनी 40 हजार रुपयांची मदत करुन तिची निवा-याची समस्या सोडवली. गावातील
महिलांच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडविण्यासाठी बचतगटाची चळवळ साह्यभूत ठरु
लागली. महिला असल्या तरी त्यांची कौटुंबिक जबाबदारीतून सुटका
नव्हती. घरचं सांभाळून त्या गावाच्या विकासात योगदान देत होत्या. या
महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज अर्धा किलोमीटर जा-ये करावी लागायची.
डोक्यावर पाण्याचे हंडे वाहून आणण्यात शारीरिक कष्ट तर होत होतेच पण मान
आणि पाठदुखीमुळंही महिला हैराण होत. दूरवरुन पाणी आणण्यासाठी वेळही वाया जात
असायचा. पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार महिलांनी केला पण मार्ग
सापडत नव्हता. त्याच वेळी माविमकडून महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी
गरजू व समस्या असलेल्या गावातील गाव समितीद्वारे प्रस्ताव मागविण्यात
आले. आवश्यक बाबींची पूर्तता केल्यावर माविम जिल्हा कार्यालयानं प्रस्ताव
मंजूर केला. त्यानुसार 12 हजार रुपये अनुदान व इतर निधी लोकसहभागातून जमा
करणं आवश्यक होतं. ग्रामपंचायतीसमोर याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला.
ग्रामपंचायतीनं जागा दिली पण आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. निधी उभा
करण्याचं मोठ्ठं आव्हान महिलांसमोर होतं. महिला जिद्दीनं पुढं आल्या.
प्रत्येक महिला बचतगटाकडून 1 हजार रुपये व लोकसहभागातून 8 हजार रुपये असे
एकूण 27 हजार 500 जमा करुन हातपंपावर मोटर बसवून पाण्याची टाकी उभारली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व लोकांचा विरोध असतांना महिलांनी हा प्रकल्प
पूर्णत्वास नेला. या हातपंपावरील विद्युत मोटारीची देखभाल दुरुस्ती व पाणी
वितरणाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली आहे. महिलांच्या
पुढाकारानं पाण्याचा प्रश्न सुटला व त्यांना स्वत:कडं, कुटुंबाकडं अन्
गावाच्या विकासाकडं लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होऊ शकला. आज
गावाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय निर्णय प्रक्रियेत महिलांचा
सहभाग वाढला आहे, हे महिला शक्तीचं द्योतकच म्हणावं लागेल.राजेंद्र
सरगजिल्हा माहिती अधिकारी,परभणी
///////////////////////////////////////////
कॉपी करणारा विद्यार्थी निलंबित
परभणी, दि.2 : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (12 वी) कॉपी
करणा-या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महात्मा गांधी
कनिष्ठ महाविद्यालय झरी येथील परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्र – 2 या
पेपरमध्ये कॉपी करताना आढळून आल्यामुळे निकेश हरी भगत याला निलंबित करण्यात
आले आहे.
///////////////////////////////////////////
3 मार्चला सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण
परभणी, दि.1 : 3 मार्च 2012 रोजी दुपारी 1 वाजता सामाजिक न्याय भवनाचा
लोकार्पण सोहळा आयोजित आहे. सामाजिक न्याय, विमुक्त, भटक्या जमाती व इतर
मागासवर्गीयांचे कल्याण व व्यसनमुक्ती कार्यमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या
हस्ते सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित
राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले
आहे. 0000000000
बुक किपींग आणि अकाऊंटन्सी, रसायनशास्त्र व तत्त्वज्ञान पेपरला गैरप्रकार
नाही परभणी, दि.1 : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा
2012 ला 21 मार्च पासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 50 परीक्षा केंद्रावर
सुरळीत आणि शांततेत परीक्षा सुरू आहे. दिनांक 29 फेब्रुवारी 2012 रोजी
सकाळच्या सत्रात झालेल्या बुक किपींग आणि अकाऊंटन्सी व रसायनशास्त्र -1 तर
दुपारच्या सत्रात तत्त्वज्ञान या विषयाची परीक्षा शांततेत व सुरळीतपणे पार
पडली. या पेपरदरम्यान कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉपी करणे वा अन्य
प्रकार आढळून न आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले
आहे. 00000000000
///////////////////////////////////////////
3 मार्च रोजी तालुका समितीची बैठक
परभणी, दि.29 : सेलू तालुक्यातील आजी/माजी सैनिक, विधवा पत्नी
यांच्या अडचणी समजून घेण्याकरीता तसेच त्यांना मार्गदर्शन करण्याकरीता
दिनांक 3 मार्च 2012 रोजी दुपारी 3 वाजता सेलू तहसील कार्यालयाच्या सभागृहात
तहसीलदार सतीश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीची बैठक
आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीला आजी-माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी
उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने केले
आहे. 000000000
परीक्षेदरम्यान कलम 144 लागू करण्याचे आदेशपरभणी, दि.29 : उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) दिनांक 21 फेब्रुवारी 2012 पासून सुरू झाली असून
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) 1 मार्च ते 28 मार्च 2012 या
दरम्यान घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा जिल्ह्यात शांततेत पार
पाडण्यासाठी 1 मार्च ते 28 मार्च 2012 या दरम्यान फौजदारी व्यवहार संहिता
1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश देण्यात आले
आहे. 000000000
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्नपरभणी, दि.29 : जिल्हा दक्षता
व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी
विश्वंभर गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला समाजकल्याण
विभागाचे सहायक आयुक्त उमेश सोनवणे, पोलीस निरीक्षक सतीश देशमुख, सरकारी वकील
एस. यू. देशमुख, समाजकल्याण विभागाचे अशोक गोडबोले, एस. ए. बल्लाळ उपस्थित
होते. यावेळी मागील सभेच्या इतिवृत्तातील कार्यवाहिच्या
मुद्दयांचा आढावा, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच नागरी
हक्क संरक्षण कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आणि न्यायप्रविष्ट
झालेल्या गुन्ह्यांचा आढावा, अत्याचार पिडीतांना समाजकल्याण विभागाकडून
मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहायाचा आढावा घेण्यात आला. तसेच अशासकीय
सदस्यांच्या सुचना व आयत्या वेळेस आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात
आली. 0000000000
प्रा. वर्षा गायकवाड यांचा परभणी जिल्हा दौरापरभणी, दि.29 : महिला व बालविकास
मंत्री प्रा. वर्षा गायकवाड दिनांक 3 मार्च रोजी परभणी जिल्ह्याच्या दौ-यावर
येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 3
मार्च 2012 रोजी सकाळी 7.10 वाजता परभणी येथे आगमन व शासकीय विश्रामगृह
हिंगोलीकडे प्रयाण, सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोलीहून परभणीकडे
प्रयाण, रात्री 7.30 वाजता सावली विश्रामगृह परभणी येथे आगमन व राखीव, रात्री
8.10 वाजता परभणी येथून मुंबईकडे
प्रयाण. 000000000
///////////////////////////////////////////
महाराष्ट्र
शासनप्रसिध्दी
पत्रक :
जिल्हा माहिती कार्यालय, परभणी
वृत्त क्रमांक: 138स्काऊट-गाईड चळवळीमुळे भावी नागरिक घडविण्यास मदतपरभणी,
दि.27- स्काऊट-गाईड चळवळीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन,
प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आदी गुणांची जोपासना होते. देशाचे भावी नागरिक
घडविण्यास ही चळवळ एक प्रकारे मदतच करते, असे प्रतिपादन जिल्हा माहिती
अधिकारी राजेंद्र सरग यांनी केले. पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे स्काऊट्स
आणि गाईड्सचा 34 वा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे
उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक
पन्नालाल मुंदडा, माणिकराव हजारे, चंद्रकांत रुद्रवार, गजानन आंबोरे, रामराव
आंबोरे आणि जिल्हा आयुक्त (स्काऊट) तथा शिक्षणाधिकारी अशोक आठवले,
जिल्हा आयुक्त (गाईड), विद्या लटपटे, जिल्हा चिटणीस सुधाकर अंदोले,
सहचिटणीस छाया खंदारे, रेहाना बेग आणि जिल्हा संघटन आयुक्त प्रकाश धुमाळे हे
उपस्थित होते. परभणी भारत स्काऊट्स आणि गाईड्सच्या जिल्हा
संस्थेद्वारे संजय गांधी जिनींग मैदानावर जिल्हा मेळावा सुरु झाला असून तो
29 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा संघटन
आयुक्त प्रकाश धुमाळे यांनी केले. ते म्हणाले, जगातील 252 देशांमध्ये
स्काऊट-गाईड चळवळ सुरु आहे. या चळवळीला शंभराहून अधिक वर्षे झाली असून
लोकसहभागातून ती चालू आहे. शिक्षणाधिकारी अशोक आठवले यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना निसर्ग निवास आणि स्वावलंबनाचे धडे
आत्मसात करण्याचे आवाहन केले. श्रीमती विद्या लटपटे यांनी स्काऊट-गाईड
चळवळीचा उद्देश आणि महत्त्व यावेळी सांगितले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत
प्रकाश धुमाळे, सुधाकर अंदोले यांनी केले. या जिल्हा मेळाव्यामध्ये मानवी
रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शोभायात्रा,
बिनभांड्याचा स्वयंपाक आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. ताडकळस येथे
यापूर्वी 1986-87 मध्ये स्काऊट-गाईडचा जिल्हा मेळावा झाला होता, त्याची
आठवणही यावेळी जागविण्यात आली.
वृत्त क्रमांक: 138परभणीत सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न
करणार - प्रा. फौजिया
खानपरभणी, दि.27 : आरोग्य क्षेत्रात परभणी जिल्ह्याचे नाव उंचावत असून
जिल्ह्यातील ओपीडी रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. एवढ्यावर
समाधान न मानता जिल्ह्यातील रुग्णांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात
यासाठी सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे
प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान
यांनी केले. वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत
होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बनसोडे,
निवासी वैद्यकीय अधिकारी एम. टी. जाधव, डॉ. रवी कुलकर्णी उपस्थित होते. नवीन
वैद्यकीय महाविद्यालयात शंभर खाटांचे महिला रुग्णालय, सुसज्ज अस्थिरोग
विभाग, रक्त विघटीकरण केंद्र आदींचा समावेश करण्यात येणार आहे.
तात्पुरत्या स्वरुपात हे महाविद्यालय जायकवाडी येथील परिसरात सुरु
करण्याचा मानस असून कायमस्वरुपी जागेचा प्रश्नसुध्दा लवकरच निकाली
काढण्यात येईल, असे त्या
म्हणाल्या. 000000000000
वृत्त क्रमांक:
137
दि. 27-2-2012बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक
सक्षमीकरण - प्रा. फौजिया
खानपरभणी, दि.27 : राज्यात 1994 पासून महिला धोरण राबवायला सुरुवात झाली आहे.
महिलांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक विकास करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. बचत
गटाची चळवळ प्रभावी ठरत असून या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व
कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी केले. सुवर्ण
जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत स्वयं सहायता समूहनिर्मित वस्तुंचे
जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री 'जनाई-2012' च्या समारोपीय समारंभात त्या
बोलत होत्या. मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी.
मित्रगोत्री, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद्माकर
केंद्रे, दक्षता समितीच्या सदस्या सोनाली देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अरुण बनसोडे उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना या
प्रदर्शनीच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असून बचत गटांनी
वस्तुंच्या दर्जावर लक्ष देण्याची गरज आहे. बाजारात ज्या वस्तु उपलब्ध
आहेत त्याची निर्मिती करण्यापेक्षा बचत गटांनी नवीन वस्तुंचे उत्पादन
करावे, असे आवाहन प्रा. फौजिया खान यांनी केले. यावेळी विविध
स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणा-या स्पर्धकांचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र
देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला रणजित मकरंद, नरहरी ढगे, कैलाश
चव्हाण, मुसा शेख तसेच मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित
होत्या.
0000000000वृत्त क्रमांक: 139कॉपी करणारे 3 विद्यार्थी निलंबितपरभणी, दि.24 :
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (12 वी) कॉपी करणा-या
दोनविद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गोकूळनाथ उच्च
माध्यमिक विद्यालय, पिंगळी या परीक्षा केंद्रावर चव्हाण प्रकाश गुलाब,
संघपाल सुधाकर वाटोरे आणि कळकुंबे सुनिता बबनराव हे विद्यार्थी कॉपी करताना
आढळून आल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
वृत्त क्रमांक: 140 साक्षर भारत यात्रेचे
आयोजन परभणी, दि.27 : राष्ट्रीय साक्षरता मिशन, मनुष्यबळ विकास
मंत्रालय, अखिल भारतीय भारत ज्ञान विज्ञान समिती, राज्य साक्षरता मिशन पुणे
आणि राज्य साधन केंद्र औरंगाबाद आणि पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने साक्षर
भारत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रा 10 मार्च 2012 रोजी बीड
येथून निघणार असून 15 मार्च 2012 रोजी यात्रेचा समारोप परभणीत
होईल. साक्षर भारत कार्यक्रमास अधिक गती देणे, या कार्यक्रमाविषयी
लोकांत जागृती निर्माण करणे तसेच स्त्री साक्षरतेचे महत्त्व या यात्रेतून
विषद करण्यात येणार आहे.
000000000000
///////////////////////////////////////////
बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण- प्रा. फौजिया खान
परभणी, दि.27 : राज्यात
1994 पासून महिला धोरण राबवायला सुरुवात झाली आहे. महिलांचा सामाजिक, राजकीय,
आर्थिक विकास करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. बचत गटाची चळवळ प्रभावी ठरत असून
या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होत आहे, असे
प्रतिपादन महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री
प्रा. फौजिया खान यांनी केले. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार
योजनेअंतर्गत स्वयं सहायता समूहनिर्मित वस्तुंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व
विक्री 'जनाई-2012' च्या समारोपीय समारंभात त्या बोलत होत्या. मंचावर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद्माकर केंद्रे, दक्षता समितीच्या
सदस्या सोनाली देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बनसोडे उपस्थित
होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना या प्रदर्शनीच्या माध्यमातून चांगले
व्यासपीठ उपलब्ध झाले असून बचत गटांनी वस्तुंच्या दर्जावर लक्ष देण्याची
गरज आहे. बाजारात ज्या वस्तु उपलब्ध आहेत त्याची निर्मिती करण्यापेक्षा
बचत गटांनी नवीन वस्तुंचे उत्पादन करावे, असे आवाहन प्रा. फौजिया खान यांनी
केले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळविणा-या
स्पर्धकांचा भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला रणजित मकरंद, नरहरी ढगे, कैलाश चव्हाण, मुसा शेख तसेच मोठ्या
प्रमाणावर महिला उपस्थित
होत्या. 0000000000
परभणीत सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न
करणार - प्रा. फौजिया
खानपरभणी, दि.27 : आरोग्य क्षेत्रात परभणी जिल्ह्याचे नाव उंचावत असून
जिल्ह्यातील ओपीडी रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. एवढ्यावर
समाधान न मानता जिल्ह्यातील रुग्णांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात
यासाठी सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करू, असे
प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान
यांनी केले. वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत
होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बनसोडे,
निवासी वैद्यकीय अधिकारी एम. टी. जाधव, डॉ. रवी कुलकर्णी उपस्थित होते. नवीन
वैद्यकीय महाविद्यालयात शंभर खाटांचे महिला रुग्णालय, सुसज्ज अस्थिरोग
विभाग, रक्त विघटीकरण केंद्र आदींचा समावेश करण्यात येणार आहे.
तात्पुरत्या स्वरुपात हे महाविद्यालय जायकवाडी येथील परिसरात सुरु
करण्याचा मानस असून कायमस्वरुपी जागेचा प्रश्नसुध्दा लवकरच निकाली
काढण्यात येईल, असे त्या
म्हणाल्या. 000000000000
कॉपी करणारे 3 विद्यार्थी निलंबितपरभणी, दि.24 : उच्च माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षेत (12 वी) कॉपी करणा-या दोनविद्यार्थ्यांवर निलंबनाची
कारवाई करण्यात आली आहे. गोकूळनाथ उच्च माध्यमिक विद्यालय, पिंगळी या
परीक्षा केंद्रावर चव्हाण प्रकाश गुलाब, संघपाल सुधाकर वाटोरे आणि कळकुंबे
सुनिता बबनराव हे विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यामुळे त्यांना निलंबित
करण्यात आले आहे.
साक्षर भारत यात्रेचे आयोजन परभणी, दि.27 :
राष्ट्रीय साक्षरता मिशन, मनुष्यबळ विकास मंत्रालय, अखिल भारतीय भारत ज्ञान
विज्ञान समिती, राज्य साक्षरता मिशन पुणे आणि राज्य साधन केंद्र औरंगाबाद
आणि पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने साक्षर भारत यात्रेचे आयोजन करण्यात
आले आहे. सदर यात्रा 10 मार्च 2012 रोजी बीड येथून निघणार असून 15 मार्च 2012
रोजी यात्रेचा समारोप परभणीत होईल. साक्षर भारत कार्यक्रमास अधिक
गती देणे, या कार्यक्रमाविषयी लोकांत जागृती निर्माण करणे तसेच स्त्री
साक्षरतेचे महत्त्व या यात्रेतून विषद करण्यात येणार
आहे. 000000000000
///////////////////////////////////////////
बचतगटामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम- पालकमंत्री
परभणी-बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे
प्रतिपादन राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश
सोळंके यांनी केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित
बचतगटाच्या वस्तू विक्री व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
याच कार्यक्रमात राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराचे पालकमंत्र्यांच्या
हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा
परिषदेच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार
मिराताई रेंगे, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, सोनाली देशमुख, धोंडीराम
चव्हाण, संतोष बोबडे, मधुसूदन केंद्रे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सोळंके यांनी बचतगटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना कायमस्वरुपी
बाजारपेठ मिळावी यासाठी स्थायी स्वरुपातील विक्री केंद्रे उभारण्यात येतील,
असे सांगितले, याशिवाय तालुकास्तरावर तसेच मोठया गावात बचतगटाच्या वस्तूंचे
प्रदर्शन मांडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जिल्हाधिकारी डॉ. वानखेडे
यांनीही बचतगटाच्या महिलांमुळे सामाजिक चळवळीला नवीन दिशा मिळाल्याचे
सांगितले. अध्यक्षीय समारोप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख
यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी एन.पी.मित्रगोत्री यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत उप मुख्य
कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी केले.
राज्यमंत्री प्रा. फौजिया खान 26 फेब्रुवारी रोजी परभणीतपरभणी, दि.24 :
सामान्य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य,
राजशिष्टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व
कुटुंबकल्याण, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री प्रा. फौजिया खान 26
फेब्रुवारी रोजी परभणी दौ-यावर येत आहे. 26 फेब्रुवारी 2012 रोजी दुपारी 1
वाजता अंबेजोगाई येथून परभणीकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता परभणी निवासस्थानी
आगमन व राखीव.
00000000000वृत्त क्रमांक: 134कॉपी करणारे 4 विद्यार्थी निलंबितपरभणी,
दि.24 : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (12 वी) कॉपी करणा-या चार
विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जय जवान जय किसान
कनिष्ठ महाविद्यालय, कावलगाव, ता. पूर्णा येथील परीक्षा केंद्रावर सुभाष
संभाजी गुलंगे तर बेलेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, पेडगाव येथील परीक्षा
केंद्रावरील पठाण अमितखान अजमखान, कायंदे रामेश्वर आनंदा आणि साळवे किशनराव
नरोजी हे विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यामुळे निलंबित करण्यात आले
आहे. 00000000000 वृत्त
क्रमांक: 135मध्यम प्रकल्पात 41 तर लघु प्रकल्पात 20 टक्के
पाणीसाठा परभणी, दि. 24 : जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात 21.188 दलघमी
तर लघु प्रकल्पात 08.316 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात
2 मध्यम तर 22 लघु असे एकूण 24 प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल
क्षमता 32.048 असून यापैकी मध्यम प्रकल्पात 21.188 दलघमी पाणीसाठी उपलब्ध
आहे. ही टक्केवारी 41 आहे. तर लघु प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता 11.488 असून
यापैकी 08.316 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ही टक्केवारी 20 आहे.
00000000000000 वृत्त क्रमांक: 136
///////////////////////////////////////////
भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्यांची निवड
परभणी, दि.18 : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुकास्तरीय
भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर आठ अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
गंगाखेड तालुकास्तरीय समितीवर विठ्ठल सातपुते, सुभाष गाढवे, भास्कर ठावरे,
पालम तालकास्तरीय समितीवर सोपान धुळगुंडे, बाजीराव डांगे तर पूर्णा येथील
तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर नामदेव ठाकूर, शिवकुमार गौरकुटे
आणि माणिकराव जाधव यांची दोन वर्षांकरीता निवड करण्यात आली
आहे. 000000000
सैन्य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन परभणी, दि.18 : सैन्य व
पोलीस दलात भरती होऊ इच्छिणा-या युवकांसाठी मेस्को करीअर अकॅडमी, सातारा
येथे दिनांक 6 मार्च ते 4 एप्रिल 2012 या दरम्यान भरतीपूर्व प्रशिक्षणाचे
आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी परभणी, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यातील
उमेदवारांची निवड चाचणी 26 फेब्रुवारी 2012 रोजी सैनिकी मुलांचे वसतीगृह
नांदेड येथे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी निवड चाचणीच्या ठिकाणी सकाळी 9
वाजता प्रमाणपत्र व गुणपत्रकांसह उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीकरीता
समादेशक, शासकीय भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सातारा यांच्याशी 7588624043
किंवा 9420697807 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
00000000000
जिल्ह्यात कलम 37(1) लागूपरभणी, दि.18 : जिल्ह्यात साजरी होणारी शिवजयंती,
महाशिवरात्री उत्सव तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेदरम्यान
जिल्ह्यात शांतता कायम राहण्याच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था
अबाधित राहण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) लागू करण्यात आले
आहे. सदर आदेश 18 फेब्रुवारी पासून 2 मार्च 2012 पर्यंत अंमलात राहील, असे
कळविण्यात आले आहे. 00000000000
10 वी व 12 वी च्या परीक्षेदरम्यान कलम 144 लागू करण्याचे आदेशपरभणी,
दि.18 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) दिनांक 21 फेब्रुवारी
2012 पासून सुरू होत असून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) 1
मार्च ते 28 मार्च 2012 या दरम्यान घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा
जिल्ह्यात शांततेत पार पाडण्यासाठी 21 फेब्रुवारी ते 28 मार्च 2012 या
दरम्यान फौजदारी व्यवहार संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश
देण्यात आले आहे. 00000000000
सोनपेठ येथे उपकोषागार कार्यालयाचे उद्घाटन
परभणी, दि. 18 : परभणी जिल्हातील सोनपेठ तालुका उपकोषागार कार्यालयाचे
उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रवीणकुमार धरमकर यांच्या हस्ते नुकतेच
करण्यात आले. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी एम.एस. गगड, प्रभारी तहसीलदार
प्रकाश यंदे, स्टेट बॅक ऑफ हैद्राबाद शाखेचे व्यवस्थापक आर.डी. नाकाडे,
उपकोषागार अधिकारी ए.पी.नरवाडे उपस्थित होते. अनेक वर्षांच्या
प्रतिक्षेनंतर तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीमध्ये उपकोषागार कार्यालय सुरु
झाले आहे. या कार्यालयामुळे तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, विविध संस्थेचे
कर्मचारी व नागरिकांची गैरसोय दूर होणार
आहे. 0000
शिवजयंतीनिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन
परभणी, दि. 18 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी
2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली वाहण्याचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व शाखा प्रमुख, अधिकारी आणि
कर्मचा-यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले
आहे. 00000
मध्यम प्रकल्पात 45 तर लघु प्रकल्पात 22 टक्के
पाणीसाठा परभणी, दि. 18 : जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात 23.282 दलघमी
तर लघु प्रकल्पात 09.229 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात
2 मध्यम तर 22 लघु असे एकूण 24 प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पाची पूर्ण जल
क्षमता 34.142 असून यापैकी मध्यम प्रकल्पात 23.282 दलघमी पाणीसाठी उपलब्ध
आहे. ही टक्केवारी 45 आहे. तर लघु प्रकल्पाची पूर्ण जल क्षमता 12.538 असून
यापैकी 09.229 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ही टक्केवारी 22
आहे. 0000
शिवाजीराव मोघे 20 फेब्रुवारी रोजी परभणीत परभणी, दि.
18 : सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे 20 फेब्रुवारी 2012 रोजी परभणी
जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. दिनांक 20 फेब्रुवारी औंढानागनाथ येथून
सोईनुसार परभणीला आगमन व राखीव, सायंकाळी 6.30 वाजता नंदीग्राम एक्सप्रेसने
मुंबईकडे
प्रयाण.
0000000
///////////////////////////////////////////
कॉपीमुकतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. वानखेडे
परभणी- गेल्या वर्षी परीक्षा केंद्रांची मान्यता काढून घेण्याची शिफारस
जिल्हा प्रशासनाने केल्यानंतरही परीक्षा केंद्र म्हणून अस्तित्वात
असलेल्या केंद्रांवर गैरप्रकार घडू नये यासाठी बारीक लक्ष ठेवण्यात येणार
असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमिक व उच्च
माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम
वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक
मैथीली झा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी. मित्रगोत्री,
अपर जिल्हाधिकारी बी.बी. चव्हाण, निवासी उप जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे,
शिक्षणाधिकारी अशोक आठवले, आर.बी. गिरी, उपशिक्षणाधिकारी एन.जी.ठाकूर तसेच इतर
अधिकारी उपस्थित होते. येत्या 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या तर
1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. परीक्षा भयमुक्त वातावरणात
पार पडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे. परीक्षा
केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हयात बारावीसाठी 50
परीक्षा केंद्रे तर दहावीसाठी 75 परीक्षा केंद्रे आहेत. बारावीसाठी 16 हजार
785 विद्यार्थी तर दहावीसाठी 25 हजार 25 विद्यार्थी बसणार आहेत. सर्वच परीक्षा
केंद्रांवर बैठे पथके असणार आहेत. याशिवाय भरारी पथके स्थापन करण्यात आली
आहेत. भरारी पथकामध्ये उप जिल्हाधिकारी, उप मुख्यकार्यकारी अधिकारी,
तहसिलदार, गट विकास अधिकारी यांचा समावेश आहे. परीक्षा कालावधीत जिल्हाधिकारी
कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात
आले.
000000
रविवारी पोलीओ लसीकरण मोहीम- जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम
वानखेडे परभणी- येत्या 19 फेब्रुवारीस जिल्ह्यात पोलीओ लसीकरण
मोहीम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम
वानखेडे यांनी दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मैथीली झा, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी. मित्रगोत्री, अपर जिल्हाधिकारी
बी.बी. चव्हाण, निवासी उप जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. अरुण बनसोडे, शिक्षणाधिकारी अशोक आठवले, आर.बी. गिरी, डॉ. आर.
एम. काझी एन.जी.ठाकूर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या
पोलीओ लसीकरण मोहीमेत शहरी भागात बुथवर जाऊन लस पिलेल्या मुलांची संख्या
केवळ 50 टक्के होती. मतदानाप्रमाणेच पोलीओ लस पाजण्यामध्येही शहरी
नागरिकांची उदासीनता बालकांच्या आयुष्याशी खेळणारी असल्याची खंत
जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे यांनी व्यक्त केली. पालकांनी आपल्या
शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना जवळच्या पोलीओ लसीकरण केंद्रावर नेऊन लस
अवश्य पाजावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1
लक्ष 37 हजार 606 तर शहरी भागात 86 हजार 400 अशा एकूण 2 लक्ष 24 हजार 6
बालकांना लस पाजण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागामध्ये 1183 तर
शहरी भागात 300 असे एकूण 1483 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
त्याकरिता 3 हजार 745 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 2700
फिरती पथके व त्यांच्या पर्यवेक्षणासाठी 900 पथके स्थापन करण्यात
आल्याचे जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. अरुण बनसोडे यांनी सांगितले.
00000000
///////////////////////////////////////////
शिवाजी महाराज जयंतीला मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश
परभणी, दि.16 : जिल्ह्यात 19 फेब्रुवारी 2012 रोजी छत्रपती शिवाजी महाराज
जयंती साजरी होत असल्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी
म्हणून शिव जयंतीला मद्य विक्री संपूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले
आहे. या आदेशाचा भंग करणा-या अनुज्ञप्तीधारकांवर कडक कारवाई करण्यात येईल,
असे जिल्हा प्रशासनाने कळविले
आहे. 00000000000
मतमोजणीसाठी मिडीया सेंटर स्थापन परभणी, दि.16 : परभणी तालुक्यातील
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवासी
उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात मिडीया सेंटर स्थापन करण्यात आले आहे.
दिनांक 17 फेब्रुवारी 2012 रोजी होणा-या मतमोजणीसाठी परभणी तालुक्यातील
पत्रकारांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून वृत्तांकनासाठी
पासेस देण्यात येतील. त्यामुळे पत्रकारांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या
कार्यालयाशी संपर्क करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी
कळविले आहे. 000000000000
--