पळस फुल

तळपता सूर्य
सर्व कोमेजले 
मात्र  त्याचे फूलने
अजुन  ना थांबले 

भग्न  झाली धरनी 
पानी  वाफालले
मात्र त्याचे फूलने 
अजुन न थांबले 


एकटाच उभा तो 
पर्वत राखनाले 
मात्र त्याचे फूलने 
अजुन ना थांबले 


तप्त हवा सोसुनी 
पानही गलाले 
मात्र त्याचे फूलने 
अजुन ना थांबले 




रुक्षतेच्या कोलाहलात
अनंत स्वप्न रंगविले
मात्र त्याचे फूलने
अजुन ना थांबले

क्रांतीचा सन्देश घेऊन
हे फुलझाड खुलले
प्रतिकुल्तेवर पाय देऊन
पळसफुल हे फुलले 

कवी-बालासाहेब पुरी

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट