संदेश

सितंबर, 2013 की पोस्ट दिखाई जा रही हैं

जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर अर्ज देणे आवश्‍यक

जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर अर्ज देणे आवश्‍यक परभणी, दिनांक 2- जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिनाचे  जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजन करण्‍यात आले होते.  जिल्‍हा लोकशाहीदिनापूर्वी 15 दिवस अगोदर अर्ज देणे आवश्‍यक असते, त्‍यानुसार केवळ एक अर्ज प्राप्‍त झाला होता. या व्‍यतिरिक्‍त प्राप्‍त झालेले 47 अर्ज प्रथमत: तालुकास्‍तरीय लोकशाही दिनात देणे आवश्‍यक होते. परंतु अर्जदारांनी तसे  न करता थेट जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिनात सादर केले.  सदर अर्ज संबंधित विभागांना पाठवून सदर अर्जावर 15 दिवसांत कार्यवाही करण्‍याचे व त्‍याचा अहवाल जिल्‍हाधिकारी कार्यालयास  सादर करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी श्री. सिंह यांनी दिले आहेत. याशिवाय संबंधित अर्जदारांना केलेल्‍या कार्यवाहीबाबत कळवण्‍यासही विभाग प्रमुखांना सांगण्‍यात आले आहे. सर्व विभागप्रमुखांनीआपल्‍या ताब्‍यात असलेल्‍या शासकीय मालमत्‍तेवरील अतिक्रमण दूर करण्‍याची कार्यवाही करुन स्‍वत:च्‍या ताब्‍यातील मालमत्‍तेचे रजिस्‍टरअद्ययावत ठेवण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी श्री. सिंह यांनी दिल्‍या. अतिक्रमण काढण्‍याबा