संदेश

नवंबर, 2013 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Parbhani

जिल्‍हा माहिती कार्यालय, परभणी" महाराष्‍ट्रात सन 2000 पासून संत गाडगेबाबा  ग्रामस्‍वच्‍छता  अभियान राबविले जात होते.  त्‍याच्‍या अभूतपूर्व यशानंतर संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाच्‍या माध्‍यमातून  ग्रामीण  भागातील जनतेमध्‍ये स्‍वच्‍छतेच्‍या सवयी  वाढीस लागून  जीवनमान उंचावण्‍याच्‍या प्रयत्‍नांना लक्षणीय  यश  मिळाले. स्‍वच्‍छतेतून निर्मलतेकडे  अधिक गतीने  वाटचाल करण्‍यासाठी  संपूर्ण स्‍वच्‍छता अभियानाचे  1 एप्रिल 2012 पासून निर्मल भारत अभियान  असे नामकरण  करण्‍यात आले.  स्‍वच्‍छतेची  व्‍याप्ती  वाढविण्‍यासाठी   प्रोत्‍साहनपर अनुदानाच्‍या निकषांच्‍या  कक्षा विस्‍तारित  करण्‍यात आल्‍या.   निर्मल भारत अभियानात दारिद्रय  रेषेखाली  सर्व कुटुंबे, अनुसूचित जाती,  अनुसूचित जमाती, अल्‍पभूधारक शेतकरी, भूमिहिन शेतमजूर,  शारिरीकदृष्‍ट्या अपंग, महिला कुटुंबप्रमुख  आदी कुटुंबे यांना  वैयक्‍तिक स्‍वच्‍छतागृह  बांधून  वापर   सुरु केल्‍यास 4 हजार 600 रुपये इतके प्रोत्‍साहनपर अनुदान  दिले  जाते. इंदिरा  आवास योजनेतील घरांना शौचालय सुविधा नसेल व त्‍यांनी  सुविधा निर्माण  केल्‍यास  त्‍यांनाही  4 हजार 600