जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर अर्ज देणे आवश्‍यक

जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर अर्ज देणे आवश्‍यक

परभणी, दिनांक 2- जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिनाचे  जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजन करण्‍यात आले होते.  जिल्‍हा लोकशाहीदिनापूर्वी 15 दिवस अगोदर अर्ज देणे आवश्‍यक असते, त्‍यानुसार केवळ एक अर्ज प्राप्‍त झाला होता. या व्‍यतिरिक्‍त प्राप्‍त झालेले 47 अर्ज प्रथमत: तालुकास्‍तरीय लोकशाही दिनात देणे आवश्‍यक होते. परंतु अर्जदारांनी तसे  न करता थेट जिल्‍हास्‍तरीय लोकशाही दिनात सादर केले.  सदर अर्ज संबंधित विभागांना पाठवून सदर अर्जावर 15 दिवसांत कार्यवाही करण्‍याचे व त्‍याचा अहवाल जिल्‍हाधिकारी कार्यालयास  सादर करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी श्री. सिंह यांनी दिले आहेत. याशिवाय संबंधित अर्जदारांना केलेल्‍या कार्यवाहीबाबत कळवण्‍यासही विभाग प्रमुखांना सांगण्‍यात आले आहे. सर्व विभागप्रमुखांनीआपल्‍या ताब्‍यात असलेल्‍या शासकीय मालमत्‍तेवरील अतिक्रमण दूर करण्‍याची कार्यवाही करुन स्‍वत:च्‍या ताब्‍यातील मालमत्‍तेचे रजिस्‍टरअद्ययावत ठेवण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी श्री. सिंह यांनी दिल्‍या. अतिक्रमण काढण्‍याबाबत करावयाच्‍या कार्यवाहीबाबतचा कृती आराखडा देखील सर्व विभागप्रमुखांना यावेळी देण्‍यात आला.
>
> वारकरी संप्रदायाने राष्‍ट्रीय एकात्‍मतेचा संदेश दिला- राज्‍यमंत्री प्रा. खान

परभणी, दिनांक –2 –वारकरी संप्रदायाने राष्‍ट्रीय एकात्‍मतेचा संदेश  दिल्‍याचे प्रतिपादन राज्‍याच्‍या सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री  प्रा. फौजिया  खान यांनी केले.  पूर्णा तालुक्‍यातील  दस्‍तापूर येथील  महादेव-पद्मावती देवस्‍थानच्‍या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या.  कार्यक्रमाच्‍या  अध्‍यक्षस्‍थानी माजी राज्‍यमंत्री  सुरेश वरपूडकर हे होते तर त्रिधारा शुगर्सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक तहसिन अहमद खान, बापूराव घाटोळ,रंगनाथराव भोसले, गणेश  जोगदंड, रमाकांत कुलकर्णी, रणजीत मकरंद, श्रीनिवास जोगदंड, सचिन जोशी, कुरेशी, डोंबे  आदींची  प्रमुख उपस्‍थिती होती.
>             राज्‍यमंत्री प्रा.  फौजिया  खान  वारकरी संप्रदायाच्‍या योगदानाबद्दल म्‍हणाल्‍या, वारकरी संप्रदाय पुरोगामी आहे.  यामध्‍ये सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. राज्‍याचे मुख्‍यमंत्री सुध्‍दा पंढरपूरला आषाढी यात्रेमध्‍ये महापुजा करुन संप्रदायाविषयी असलेली बांधिलकी स्‍पष्‍ट करत असतात.  वारकरी संप्रदायामुळेच  संत तुकाराम, संत गाडगे महाराज, महात्‍मा फुले, महर्षि वि. रा. शिंदे  आदी संत, समाजसुधारक निर्माण होऊ शकले.  महाराष्‍ट्र  शासनाने पुरोगामी विचारांचा  नेहमीच पुरस्‍कार केला आहे.  यासाठी विविध  कायदे निर्माण केले आहेत.  कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी होण्‍यासाठी  समाजात कायदा रुजायला हवा. चांगला समाज निर्माण होण्‍यासाठी वारकरी संप्रदायाने मदत करायला हवी असे आवाहनही त्‍यांनी केले. काही व्‍यक्‍ती   समाजात दरी निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत,अशा परिस्‍थितीत वारकरी संप्रदायाची जबाबदारी वाढल्‍याचे  नमूद करुन राज्‍यमंत्री प्रा.  खान यांनी श्रध्‍देला समाजात महत्‍त्‍चाचे स्‍थान असल्‍याचे सांगितले.  कितीही  वैज्ञानिक प्रगती झाली तरी श्रध्‍देमुळे  मिळणारे समाधान कशातच  मोजता येणार नाही. परिपूर्ण मानव निर्माण  होण्‍यासाठी श्रध्‍दा महत्‍त्‍वाची असल्‍याचे   त्‍या म्‍हणाल्‍या.  देवस्‍थानने  मांडलेल्‍या मागण्‍यांबाबत आपण आवश्‍यकती  कार्यवाही  करु, असे आश्‍वासन त्‍यांनी दिले. कारखानदारी  चालली  तरच विकास होऊ शकतो, त्‍यासाठी सर्वांनी आवश्‍यकते सहकार्य करावे, असे आवाहन त्‍यांनी केले. देवस्‍थानच्‍यावतीने धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक तसेच शेतक-यांच्‍या जीवनविकासासाठी कार्य होत असल्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले.
>             माजी राज्‍यमंत्री सुरेश वरपूडकर यांनीही  आपल्‍या भाषणात वारकरी संप्रदायाचा  गौरव केला.  राष्‍ट्रीय एकात्‍मतेचा वारसा  जपण्‍याचे कार्य  वारकरी संप्रदायाने केल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
> कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक अच्‍युतमहाराज यांनी केले. यावेळी दस्‍तापूर, लिमला, झाडगाव आदी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.
>                                                           00000000

पुण्‍याला सैन्‍य भरती मेळावा  
        
परभणी, दि. 02 : भारतीय सैन्‍यामध्‍ये  सोल्‍जर पद -41, क्‍लार्क पद -1 आणि ट्रेडसमॅन पद -2 या पदासाठी 101 मराठा एल.आय. मार्फत पिंपळे निलक गावाचे मैदान, औध कॅम्‍प पुणे येथे  दिनांक 2 सप्‍टेंबर 2013 दरम्‍यान भरती होत आहे.  ज्‍यांचे वय 18 वर्ष ते 42 वर्ष आहे व शिक्षण सोल्‍जर पदासाठी 45 टक्‍के मार्कस घेऊन 10 वी  पास, क्‍लार्क पदासाठी 12 वी कला /वाणिज्‍य/विज्ञान मध्‍ये सर्व विषयात 40 टक्‍के मार्कस घेऊन  उत्‍तीर्ण असावा तसेच  ट्रेडसमॅनसाठी  फक्‍त 10 वी उर्त्‍तीण असावा, टक्‍केवारीची अट नाही. वरील सर्व पदासाठी उंची 160 सें.मी., वजन 50 किंग्रॅम, छाती 77-82 संमी आहे. जिल्‍हयातील दच्‍छुक युवकांनी  सैन्‍यात भरती होऊन या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन ले. कर्नल समीर राऊत (निवृत्‍त), जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, परभणी यांनी केले आहे.

राष्‍ट्रीय बाल शौर्य पुरस्‍कारासाठी आवाहन

परभणी, दि. 02 :  ज्‍या मुलांनी स्‍वत:चे  प्राण धोक्‍यात घालून दुस-याचे प्राण वाचविले अशा अतुलनीय धारसाबद्दल राष्‍ट्रीय बाल शौर्य पुरस्‍कार दिला जातो. सदर पुरस्‍कारासाठी  आवश्‍यक अर्जाचा नमुना व योजनेची माहिती शासनाच्‍या व इंडियन कौन्‍सिल फॉर चाईल्‍ड वेलफेअर, नवी दिल्‍ली यांचे वेबसाईवर www.iccw.org   वर उपलब्‍ध आहे. त्‍यासाठी पुढीलप्रमाणे अटी आहेत. 
> मुलाचे वय 6 वर्ष  ते  18  वर्ष असावे, घटनेचा कालावधी 1 जुलै 2012 ते 30 जुन 2013 असावा,  अर्जासोबत पोलीसाचा एफ आय आर ची प्रत, पोलीस डायरी व वृत्‍तपत्र कात्रण इ. जोडावे, मुलाच्‍या वयाचा दाखला,  दोन सक्षम प्राधिका-याच्‍या शिफारशी( जिल्‍हाधिकारी/जिल्‍हा पोलीस अधीक्षक व तत्‍सम) जोडाव्‍यात. या अटींची पूर्तता करणा-या बालकांनी दि. 7 नोव्‍हेबर 2013 पर्यंत जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी परभणी यांच्‍या कार्यालयात प्रस्‍ताव सादर करावेत, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

जननी शिशू सुरक्षा योजना
सन 2011 च्‍या जनगणनेमध्‍ये परभणी जिल्‍ह्यात  मुलींचे दर हजार मुलांमागील प्रमाण कमी असल्‍याचे लक्षात आले.  या सामाजिक समस्‍येवर मात करण्‍यासाठी सार्वजनिक आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री यांनी विविध माध्‍यमांद्वारे जनजागरणाचे काम हाती घेतले.   मुलींची  गर्भातच हत्‍या   होऊ नये, त्‍यांच्‍या संख्‍येत वाढ होण्‍यासाठी असणा-या कायद्यांची कडक अंमलबजावणी व योजनांचा लाभ तळागाळापर्यंत जावा यासाठी संबंधित यंत्रणांना स्‍पष्‍टपणे आदेश दिले.
>  माता-मृत्‍यूदर व अर्भक मृत्‍यूदर कमी करण्‍याच्‍या उद्देशाने जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम संपूर्ण राज्‍यात सुरु करण्‍यात आला आहे. परभणी जिल्‍ह्यातही या कार्यक्रमाची यशस्‍वी अंमलबजावणी होत आहे. या जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रयरेषेखालील, दारिद्रय  रेषेवरील तसेच प्रसुतीसाठीच्‍या कोणत्‍याही खेपेच्‍या गरोदर स्‍त्रीस व 30 दिवसांच्‍या आत नवजात अर्भकास सर्व प्रकारच्‍याआरोग्‍यविषयक सेवा सर्व शासकीय आरोग्‍यसंस्‍थांमध्‍ये मोफत देण्‍यात येतात.
> मातामृत्‍यूदर व अर्भक मृत्‍यूदर कमी करणे हे आरोग्‍य सेवा  कार्यक्रमाचे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे उद्दिष्‍ट आहे.  प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्‍यान व प्रसूतीपश्‍चात मोफत सेवा देणे, तसेच नवजात अर्भकाला जन्‍मल्‍यानंतर 30 दिवसांपर्यंत आवश्‍यक त्‍या सर्व सेवा मोफत पुरविण्‍यात आल्‍यास  माता - मृत्‍यूदरव अर्भक मृत्‍यूदर कमी करण्‍यास निश्‍चितपणे मदत होईल. राज्‍यामध्‍ये आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये प्रसूतीचे प्रमाण 92 टक्‍के आहे. तथापि या संस्‍थेतील प्रसुतीपैकी 40 टक्‍के ते 60 टक्‍के प्रसुती खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये होतात.  घरी होणा-या प्रसूती दरम्‍यान प्रशिक्षीत दायी नसणे,स्‍वच्‍छतेचा अभाव, योग्‍य औषधी न मिळणे या कारणांमुळे माता मृत्‍यू किंवा अर्भक मृत्‍यूची भीती असते. त्‍यासाठी शासकीय आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये प्रसूती होणे, माता आणि बालकाच्‍या हिताचे असते.
>             शासकीय संस्‍थांमधील प्रसुती होणा-या मातांना औषधी, विविध तपासण्‍या, प्रसंगी सिझेरियन इत्‍यादीसाठी लागणारे साहित्‍य बाहेरुन खरेदी करण्‍यासाठी तसेच मातेला संदर्भित केल्‍यानंतर आवश्‍यक त्‍या वाहनाची सोय करणे यासाठी संबंधित मातेला किंवा तिच्‍या कुटुंबियांना खर्च करावा लागतो.पैशाअभावी  यामध्‍ये    
> होणा-या विलंबामुळे प्रसंगी माता मृत्‍यू  अथवा अर्भक मृत्‍यू होण्‍याची  शक्‍यता असते. हे टाळण्‍यासाठी जननी शिशु सुरक्षाकार्यक्रमांतर्गत  माता व नवजात  अर्भकांना सार्वजनिक आरोग्‍य संस्‍थांमध्‍ये संपूर्ण मोफत सेवा पुरविण्‍यात येत आहेत. यामध्‍ये अनुसूचित जाती, अनुसूचितजमाती, दारिद्रय रेषेखालील, दारिद्रय रेषेवरील तसेच प्रसुतीसाठीच्‍या कोणत्‍याही खेपेच्‍या गरोदर स्‍त्रीस व 30 दिवसांच्‍या आत नवजात अर्भकास सर्वप्रकारच्‍या आरोग्‍यविषयक सेवा सर्व शासकीय आरोग्‍य संस्‍थामध्‍ये मोफत देण्‍यात येत आहेत.
>            गरोदर मातेला खालीलप्रमाणे आरोग्‍यविषयक सेवा मोफत देण्‍यात येतात.     1) मोफत प्रसुती तसेच मोफत सिझेरियन शस्‍त्राक्रिया,  2)प्रसुतीसंदर्भातील औषधे व लागणारे साहित्‍य संस्‍थेतील उपलब्‍धतेनुसार मोफत पुरविणे,  3) प्रयोगशाळेतील आवश्‍यक त्‍या तपासण्‍या मोफत करणे, 4)प्रसुतीपश्‍चात मातेला मोफत आहार देणे, 5) मोफत रक्‍त संक्रमण देण्‍यासाठी मोफत रक्‍त पुरवठा, 6) प्रसुतीसाठी घरापासून दवाखान्‍यात मोफत वाहनव्‍यवस्‍था 7) एका आरोग्‍य संस्‍थेतून पुढील संदर्भ सेवा देण्‍यासाठी  दुस—या आरोग्‍य संस्‍थेत पोहोचविण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था, 8) प्रसुती पश्‍चातआरोग्‍य  संस्‍थेतून घरी पोहोचविण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था, 9) शासकीय आरोग्‍य संस्‍थेमध्‍ये गरोदर मातेस कोणतीही फी किंवा शुल्‍क आकारण्‍यातयेत नाही.
>             नवजात अर्भकास 30 दिवसांपर्यंत  खालीलप्रमाणे  आरोग्‍यविषयक सेवा मोफत देण्‍यात येतात.  1) मोफत आरोग्‍य सेवा, 2)नवजात अर्भकाच्‍याउपचारासंदर्भातील औषधे व लागणारे साहित्‍य संस्‍थेतील उपलब्‍धतेनुसार मोफत पुरविणे, 3) प्रयोगशाळेतील आवश्‍यक त्‍या तपासण्‍या मोफत करणे, 4)मोफत रक्‍त संक्रमण देण्‍यासाठी मोफत रक्‍त पुरवठा, 5) घरापासून दवाखान्‍यात मोफत वाहन व्‍यवस्‍था, 6) एका आरोग्‍य संस्‍थेतून पुढील संदर्भ सेवादेण्‍यासाठी दुस-या आरोग्‍य संस्‍थेत पोहोचविण्‍यासाठी  मोफत वाहन व्‍यवस्‍था, 7) आरोग्‍य संस्‍थेतून घरी पोहोचविण्‍यासाठी मोफत वाहन व्‍यवस्‍था. 8)शासकीय आरोग्‍य संस्‍थेमध्‍ये नवजात अर्भकास कोणतीही फी अथवा शुल्‍क आकारण्‍यात येणार नाही.
>        गरोदर मातेला, प्रसुती अंतर्गत व प्रसुती पश्‍चात मातेला तसेच 30 दिवसांपर्यंतच्‍या नवजात अर्भकांना मोफत सेवा देत असताना खालील बाबींचीदक्षता घेण्‍यात येते.
> मोफत औषधी व साहित्‍य पुरवठा - गरोदर मातेस कोणतीही फी (बाह्य रुग्‍ण विभाग पेपर इ.) आकारण्‍यात येणार नाही. गरोदरपणी आवश्‍यक असलेल्‍यालोहयुक्‍त गोळ्या व इतर आवश्‍यक गोळ्या, औषधी, इंजेक्शन्‍स् इत्‍यादी  मोफत पुरविल्‍या जातील. प्रसुती तसेच सिझेरियनसाठी कसल्‍याही प्रकारची औषधी, साहित्‍य मोफत दिली जातील. त्‍यासाठी पैसे आकारण्‍यात येणार नाहीत. प्रसुतीपश्‍चात 6 आठवड्यांपर्यत, गरोदरपणातील, प्रसुती अंतर्गत, प्रसुती पश्‍चात उद्भवणारी गुंतागुंत नवजात अर्भकास 30 दिवसांपर्यंत सर्व प्रकारच्‍या सेवा मोफत देण्‍यात येतील. यासाठी कसल्‍याही प्रकारची औषधी अथवा साहित्‍यासाठी   प्रिस्‍क्रीप्‍शन्‍स  देण्‍यात येणार नाही.
>        प्रसूती होणा-या प्रत्‍येक आरोग्‍य संस्‍थेत  आवश्‍यक त्‍या औषधाची यादी व उपलब्‍धता स्‍पष्‍टपणे फलकावर निर्देशित केली जाईल.
> प्रयोगशाळेतील व इतर तपासण्‍या-   गरोदरपणातील, प्रसुतीअंतर्गत, प्रसुतीपश्‍चात 6 आठवड्यांपर्यत तसेच सिझेरियनसाठी आवश्‍यक त्‍या सर्व प्रकारच्‍याप्रयोगशाळा तपासण्‍या मोफत करण्‍यात येतील. आवश्‍यक त्‍या मातेस अल्‍ट्रा सोनोग्राफी सुविधा मोफत पुरविण्‍यात येईल. नवजात अर्भकास 30दिवसांपर्यंत आवश्‍यक त्‍या सर्व
> ...

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट