कविता -आत्मविश्वास

आत्मविश्वास
मी कोण कुठला
ठाउक  नव्हते मला
जीवनाच्या माध्यान्ही
हां अंगार कसा फुलला

ना गाव ना नाव
कुठेच नव्हता ठाव
त्रय्स्थान्च्या नजरेत होता
संभ्रमित भाव

मी माज़ेच केले मूल्य शून्य
अंतरात्माही मलिन जहाला
विश्वाच्या या पसार्यात
हां कवडसा कुठून आला

शुभ्र पांढरी ज्योत
आसमंत भरून उरली
ह्रुदयातुन ती शिरता
सारी जल्मते जलाली

निरभ्र जहाले आकाश
अन धर्निवर हिरवल
अस्तीत्वाच्या खुणा शोधण्या
सुरु माझी चलवल

भुत्कालाच्या स्मृति जलाल्या
वर्तमान हां उगवला
भविष्याचा वेध घेन्या
अंगार हां फुलला

कवी -बालासाहेब पूरी

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट