पुस्तक परिक्षण -अनपेक्षित

            कविता ही कवीची कल्पना आहे ,असे म्हटले जाते .मात्र माझ्या मते कविता म्हणजे एक जलजलित वास्तव असत.कवितेतील अनुभवांशी कविचे तादात्म्य होने आणि तो काव्यानुभव कवीने स्वतहा जगने हे याचे निदर्शक आहे .शब्द न शब्द जगनार्या कविच्या कवितेला कल्पना का म्हणतात ,हे न उलगदनारे  कोड़े आहे .                                                                           
           असेच एके दिवशी अनपेक्षित रित्या कवयित्री वैशाली कोतंबे घोदजकर यांचे जलजलित वास्तव असणार पुस्तक हातात पडले आणि मानव जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणार्या काव्य रचना पाहून साहित्या मधे कवयित्री प्रा. वैशाली कोतंबे मैलाचा दगड ठरतील याची खात्री पटली.कवयित्री प्रा. वैशाली कोतंबे या नवख्या कवी असल्या तरी साहित्याशी फार जुना सम्बन्ध असल्याची खात्री त्यांच्या काव्यरचना वाचून पटते. निसर्ग ,नाते सम्बन्ध ,तानतनाव,समाजरचना ,भावना ,प्रेम ,मानुस्किचा शोध एवढचकाय जीवनात घडणार्या अनपेक्षित घटना या सर्वांवर भाष्य करणार काव्य अनपेक्षित या काव्य्संग्रहा मधे आढलत .सहसा इतर पुस्तकामधे एखाद्या विशिष्ट विषयाच्या परिघामधे काव्यरचना आढ लते. त्या मानाने हे पुस्तक उजवे ठरू शकते .
            मान्वतच्या के.के. एम् महाविद्या लयात  अध्यापन करीत असलेल्या या प्राध्यापिकेच निसर्गाशी फार जवलाच नात दिसत ."निळ्याआकाशी सांज वेळी ,पक्षी गगन भरारी घेई ,खेलकर वारा हलुवार आला ,खेलवितो कसा बागेमधल्या फुलाला ""पहाटेचा गारवा स्पर्शुन गेला ,झोपेतून मज जागवून गेला "या व् इतर अनेक काव्यो ली कवयित्रिचे निसर्गाचे कसे अटूट नाते आहे हे दाखवतात ."जीवन "आहे संघर्ष प्रत्यकक्षणी दिसतो ,अंधारा च्या नंतर प्रकाश पुढे हस्तो 'असे अत्यंत साध्या सोप्या आणि समजेल अशाशब्दामधे जीवनविषयक तत्वद्यान मान्दनार्याया कवयित्रिने प्रितीचे रूप अत्यंत तरल अशा शब्द्दमाधे रेखाटले आहे .जसे की ,"माझा जिव तुझ्यात असा गुंतला की ,माझा जिव अन युझा जिव एकच होउनगेला "."जसे पावसाने स्रुष्टिवारिल कण न कण भिजुन निघाले ,तशी सख्या तुझ्या प्रेमात मी न्हाउन निघाले "
             मानवी जिवनामधे सुख दुखाचे अनेक चढ़ उतार येत असतात .यश असत त्याच प्रमाणे अपयाश्ही असत  .अपयशाने खचून जाने किंवा यशाने हुर्लूं जाने ,मानवी जिवनामधीबसत नाही .अपयश आले म्हणून हारून बसण्यापेक्षा स्वबलावर इप्सित साद्य करण्यासाठी मानवाचे प्रयत्न हवेत .यातच मानव जन्माचे सार्थक आहे .हे सर्व करत असताना माणुसकी विसरून कशी चालेल .अशा आशयाची "मानवी जीवन "ही कविता या पुस्तकाची शान वाढवते .
            स्वच्छ सुन्दर गाव ,समानता ,दोष द्यावा कोणाला ,दरी अशा सामाजिक सन्दर्भ असलेल्या कविता काही सामाजिक प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करतात .स्वच्छ व् सुन्दर गावामधून स्वछ्तेचा पुरस्कार केलेला आहे .मुलगी आणि मुलगा यामधे भेदभाव नसावा , मुलींची प्रगति नेत्र दीपक आहे .मुली कोणत्याही क्षेत्रा मधे कमी नाहित .समानता या कवितेच सूत्र आहे .बाल मजुरावर्चीदोष द्यावा कोणाला आणि आर्थिक विषम्तेवर भाष्य करणारी "दरी" या कविता विचार प्रवृत्त करणार्या आहेत .
"सांग नारे बोल नारे ,तू असा निश्ब्द्द का "निश्ब्द्द या कवितेच्या ओली वाचताना असे वाटते की ,ही काव्य रचना प्रेम काव्य असाव !रुसलेल्या प्रियकराला लादिवाल शब्द्दा मधे प्रेयसी बोलते करण्याचा प्रयत्न करते आहे ,असे वाटते .मात्र इथे वेगलच घडत .आत्म्भान हरवलेल्या मानवाला {प्रियकराला}सत्याचा शोध घेण्यासाठी प्रेरित करणारी ,त्याला प्रोत्साहन देणारी ,मानवाच्या कर्तुत्वाच तेज दिसल पाहिजे असे म्हन्नारी कवयित्री आपल्याला इथे आधा लते जिवनामधे सुखी व्हायच असेल तर "नात "हे भावनांच्या पाक्ल्यांनी गुम्फ लेल  हव .आणि "डोळ्यांची भाषा "स्नेहार्द हावी .इतरांनी "निंदा "टालायला हवी ."श्ब्द्द "हे शस्त्र आहेत .त्यांचा वापर खुबीने व्हायला हवा .असे अनेक विचार :कवितेचा गंध "होउन पुस्तकामधे विखुरलेत. आणि त्या गंधाने काव्य रसिकांना ब्रम्हानंदी लिन झाल्याचा अनुभव येइल .
             मद्द्यंतरी शेतकर्यांच्या  आत्महत्या गाजत होत्या ,पैशांच्या तानावामुले हे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अनुसराय्चे .कदाचित हे पुस्तक त्या वेळी निघाले असते तर आत्महत्येचा एक तरी आकडा कमी झाला असता .ही अतिश्योक्ति नव्हे तर "आत्महत्या का "व् "टेंशन का "या कविते मधे तेव्ह्ध सामर्थ्य आहे .मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा हां काव्य संग्रह म्हणजे जलजलित वास्तव आहे .तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात हां काव्यानुभव आलेला असतो .पुस्तकाचे मुखपृष्ट उत्तम आहे .मुद्रण व् बांधनिही चांगली आहे .पुस्तक सर्वांगाने सुन्दर आहे .फ़क्त अनपेक्षित हे नाव अनपेक्षितरीत्या ठेवले आहे की काय असे वाटते .परभणी जिह्ल्यातिल साहित्य क्षेत्रात मानाचा तुरा असणार हे पुस्तक काव्य रसिकांना मेजवानीच आहे .
लेखक -बालासाहेब पूरी .

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट