कविता -लग्नानंतर सार काही

गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ,
मी अशान गावनार नाही ,सागून ठेवते लग्नानंतर सार काही .

पाहिल जेव्हा तुला ,
केल घायाल मला .
ऐश्वर्याच आहेस जणू काही ,
माझ्या प्रिये होते जिवाची लाही लाही .

गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ......[१]

कस सांगू तुला ,
झोप येईना मला .
तुझ्या विना करमत नाही ,
माझे रानी म्हनू नको मला तू नाही .

गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ......[२]

वचन देतो तुला ,
साथ देइल तुला .
दग़ाबाजी मी करणार नाही ,
माझे रानी शंका आनु नको मणि काही .

गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ......[३]

अस रुसू नको ,
अंत पाहू नको .
विचारान करू सार काही ,
माझे लैला पप्पी देण्याची कर आता घाई.

गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ......[४]

पटल सार मला ,
सांगते राजा तुला .
जिव कासाविस माझा होई ,
माझ्या राजा कर लग्नाची लवकर घाई .

गोंडा घोलू नको ,गोड बोलू नको ,
मी अशान गावनार नाही ,सागून ठेवते लग्नानंतर सार काही .[५]

कवी -नाईक लक्षमण सीतारामजी ,पाथ्रीकर,
पाथरी ,जी .परभणी.महा .
फोन -9823955224

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट