कविता -अवचित आली सर

बावरल रान सार
वाट मेघाची पाहून
अवचित आली सर
जसा भेटला साजन

कसा थेम्बा थेम्बा तुन
पान्हा गाभारी घुसला
आतुरल्या मातीतून
गंध शिवारी हसला

श्रंगारली काळी माती
हिरव्या शालुच्या रंगात
रूप डोळ्यात भरले
गाते कोकीला सुरात

डुले शिवारी जोंधला
पोट अवघे थिरावले
ओठी पाखरांच्या आज
दान कुणी भरविले

तूच एक अशी माय
तुज्ह्या प्रेमा नाही भान
अवचित आली सर
जसा भेटला साजन

कवी -आत्माराम कूटे
वडी,ता .पाथरी जी .परभणी. 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट