पावसाचा काय गुन्हा .

सखे तुला मी पाहिले ,
पावसात भिजताना ,
मी ही भिजुन चिम्ब झालो ,
पावसात नसताना .

भावना  त्या सैल झाल्या ,
भिडल्या जाउन नक्षत्राला ,
दोष देऊ सांग कसा ,
भिजलेल्या वस्त्राला .
भिजलेले अंग तुझे ,
नजर का न्याहांळीते 
गालावरचे थेम्ब तुझ्या
प्रीत उरी जागवीते.

पाहुनिया रूप तुझे ,
घडल्या ग खाना खुना,
सांग मला सांग सखे ,
पावसाचा काय गुन्हा .

कवी;आत्माराम कुटे,वडी,ता.पाथरी
फ़ोन;

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट