बातमी -कष्टकरी अर्ध पोटी कुणब्याचे हाल ;लबाडाची शिरजोरी ,दलाल मालामाल

बातमी -कष्टकरी अर्ध पोटी कुणब्याचे हाल ;लबाडाची शिरजोरी ,दलाल मालामाल
 ग्रामीण कवी आत्माराम कुटे यांचे विद्यार्थ्यांशी हितगुज 

देवगाव फाटा -दि .२८.०९.११.


जमीन कसणारा शेतकरी मागील दहा वर्षापासून वेगवेगळ्या समस्यांच्या चक्रव्हुहात  अडकला जात आहे .
शेतकर्यांच्या आर्थिक कणा समजल्या जाणार्या कापसाचे शेतकरी काबाड कष्ट  करून उत्पादन घेतो .मात्र व्यापार्यांना कापूस विकतांना भाव कमी व व्यापार्या कडे कापूस गेला कि भाव जास्त ,असा अनुभव शेतकर्यांना गतवर्षी आला .यामुळे कष्टकरी अर्धपोटी कुणब्याचे हाल ,लबाडाची  शिरजोरी ,दलाल मालामाल  हि वास्तवता जोपर्यंत बदलत नाही ,तोपर्यंत बळीराजाला सुख मिळणार नाही ,आसे मत ग्रामीण कवी  आत्माराम कुंटे यांनी व्यक्त केले .

देवगाव फाटा येथील शांताबाई नखाते विद्यालयात २३ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या कवीशी सुसंवाद या उपक्रम कवी कुटे  बोलत होते .व्यासपीठावर मुख्याध्यापक द्यानेश्वर भिसे ,कवी विठ्ठल चव्हाण ,पंडित काकडे ,संजय होगे ,यांची उप स्थिती  होती पुढे  बोलताना कुटे म्हणाले ,नवीन तंत्राद्याना मुळे शेतीचा खर्च वाढला आहे .शेतीही इतरनावर अवलंबून आहे ,निसर्गाने साथ दिली तरी ,बाजार भावाची साथ मिळेलच ,याची शास्वती नाही .त्याच बरोबर भ्रष्टाचारा विषयी मार्गदर्शन केले .वाढते प्रदूषण व पर्यावरणाचा र्हास यामुळे निसर्गामद्ये असमतोल निर्माण झाला आहे ,जोपुनिया रोप ,त्याची कर हिरवे या वनासी .या कवितेतून वृक्ष संवर्धनाची गरज त्यांनी लक्षात आणून दिली .कवी  विठ्ठल चव्हाण यांनी  तन काढता काढता जीव होई व्याकुळ ,कर्जाच बियानअन झाल लग्नाच रीन ,भाव कमी कापसाला राया गेला हाब्कून .हि कविती सादर केली .सूत्रसंचालन प्रभू शिंदे यांनी केले ,तर मुक्तीराम वाव्हळे यांनी आभार मानले .

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट