जातप्रमाणपत्र पडताळणीबाबतचे प्रस्‍ताव 15 नोव्‍हेंबरपर्यंत सादर करण्‍याचे आवाहन



                           परभणी, दि. 1: स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्‍छिणा-या मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतचे प्रस्‍ताव 15 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्‍यात आले आहे.
जानेवारी 2012 ते मार्च 2012 या कालावधीत होणा-या स्‍थानिक स्‍वराज्‍य निवडणुकिकरीता राखीव प्रभागातून निवडणूक लढवू इच्‍छिणा-या अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवारांचे सदर जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्‍ताव संबंधित तहसील कार्यालयात 15 नोव्‍हेंबर 2011 पर्यंत स्‍वीकारले जातील, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्‍यावी, असे जिल्‍हा प्रशासनातर्फे कळविण्‍यात आले आहे.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट