परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

शिधापत्रिका रद्द झालेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी
परभणी, दि.17 : अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या शासन
परिपत्रकानुसार अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम 2011 अंतर्गत ज्‍या
शिधापत्रिकाधारकांनी शिधापत्रिका विहित नमुन्‍यामध्‍ये व विहित कालावधीत अर्ज
सादर न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या शिधापत्रिका रद्द झाल्‍या आहेत. अशा
शिधापत्रिकाधारकांना एक विशेष बाब म्‍हणून दिनांक 1 ते 30 एप्रिल 2012 या
कालावधीत विहित केलेल्‍या पुराव्‍यासह विहित नमुन्‍यातील अर्ज भरण्‍याची
पुन्‍हा एकदा अखेरची संधी देण्‍यात येत आहे. अं‍तिम संधीच्‍या काळात विहित
नमुन्‍यातील अर्ज पुराव्‍यासह सादर करताना अर्जदाराने यापूर्वीच्‍या
मोहिमेच्‍या काळात विहित नमुन्‍यातील अर्ज सादर का केले नाहीत, याबाबतची
कारणेसुध्‍दा नमूद करणे आवश्‍यक राहील, असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी, परभणी
यांनी कळविले आहे. 0000000000000000
अंगणवाडीसाठी खाऊ पुरवठादारांची 19 एप्रिल रोजी बैठक परभणी, दि. 17 :
परभणी जिल्‍हा अंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडीतील बालकांना दूध, अंडी, केळी,
शेंगदाणे, बटाटे, गूळ, खजूर, चणे, फुटाणे आदी 10 वस्‍तुंचा पुरवठा अंगणवाडी
स्‍तरावर करण्‍यासाठी निविदा मागविण्‍यात येणार आहेत. यासाठी जिल्‍हा स्‍तरावर
जिल्‍हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठीत
करण्‍यात आली असून दिनांक 19 एप्रिल 2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा परिषद
सभागृहात सर्व स्‍थानिक पुरवठादारांची बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. सदर
बैठकीत निविदेबाबतच्‍या अटी व शर्ती समजावून सांगितल्‍या जाणार आहेत. तरी
पुरवठादारांनी बैठकीस उपस्‍थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा परिषद उप मुख्‍य
कार्यकारी अधिकारी श्री. नीला यांनी केले आहे.
--

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट