परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

स्वाईन फ्ल्यू बाबत काळजी घेण्याचे आवाहन
परभणी, दि. 11: जिल्‍ह्यात स्‍वाईन फ्ल्‍यू रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी
प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीने जिल्‍हाधिकारी डॉ. शालीग्राम
वानखेडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संयोजन समितीची बैठक संपन्‍न झाली. बैठकीला
जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. एल. डी. नारोळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.
टी. जाधव, डॉ. पी. आर. पाटील, डॉ. संगिता भंगे, डॉ. आर. एम. काझी, मनपा
उपायुक्‍त दीपक पुजारी उपस्‍थित होते. स्‍वाईन फ्ल्‍यू च्‍या प्रतिबंधासाठी
आरोग्‍य विभागाने आवश्‍यक त्‍या उपाययोजना कराव्‍यात. तसेच नागरिकांत या
रोगाविषयी जनजागृती करावी, अशा सुचना जिल्‍हाधिकारी डॉ. वानखेडे यांनी
केल्‍यात.यावेळी विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्‍थित
होते. 0000000000
सैन्‍य व पोलीस दलासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजनपरभणी, दि.11 : सैन्‍य व
पोलीस दलात भरती होऊ इच्‍छिणा-या युवकांसाठी मेस्‍को करीअर अकॅडमी, सातारा
येथे दिनांक 7 मे ते 5 जून 2012 या दरम्‍यान भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे
आयोजन करण्‍यात आले आहे. त्‍यासाठी परभणी, नांदेड व हिंगोली या जिल्‍ह्यातील
उमेदवारांची निवड चाचणी 26 एप्रिल 2012 रोजी सैनिकी मुलांचे वसतीगृह नांदेड
येथे होणार आहे. इच्‍छुक उमेदवारांनी निवड चाचणीच्‍या ठिकाणी सकाळी 9 वाजता
प्रमाणपत्र व गुणपत्रकांसह उपस्‍थित राहावे. तसेच अधिक माहितीकरीता 7588624043
किंवा 9420697807 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्‍हा सैनिक कल्‍याण
अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
--

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट