parbhani-अनुकंपा यादी :आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल


अनुकंपा यादी :आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल

परभणी, दि.18 : जिल्‍हा परिषद अंतर्गत अनुकंपा उमेदवारांची यादी
जिल्‍हा परिषदेच्‍या नोटीस बोर्डवर प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. तसेच सदर यादी
अवलोकन करण्‍यासाठी सामान्‍य प्रशासन विभागामध्‍ये ठेवण्‍यात आली असून जिल्‍हा
परिषद अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांनी यादीतील आपले नाव, जेष्‍ठता आदीबाबत
खात्री करून घ्‍यावी. तसेच काही आक्षेप असल्‍यास दिनांक 27 एप्रिल 2012 पर्यंत
सदर आक्षेप सामान्‍य प्रशासन विभागाकडे सादर करावेत, असे मुख्‍य कार्यकारी
अधिकारी, जिल्‍हा परिषद यांनी कळविले आहे. 0000000000000000वृत्‍त क्रमांक: 245
सहायक गुप्‍तवार्ता अधिकारी पदासाठी अर्ज करण्‍याचे आवाहन परभणी, दि.
18 : राज्‍य गुप्‍तवार्ता विभागात सहायक गुप्‍तवार्ता अधिकारी (गट-क) पदे
सरळसेवेने भरावयाची आहेत. माजी सैनिकांसाठी प्रवर्गनिहाय एकूण 11 पदे (अज-1,
अजा-2, इमाव-2 आणि खुला-6) आरक्षित असून याकरीता अर्ज मागविण्‍यात येत आहेत.
भरतीबाबतची व ऑनलाईन अर्ज करण्‍याबाबतची माहिती www.mahapolice.gov.in या
संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. तरी परभणी जिल्‍ह्यातील अर्हताप्राप्‍त माजी
सैनिकांनी या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी
यांनी केले आहे.
--

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट