परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

जिल्हा माहिती कार्यालय, परभणी
राज्यमंत्री प्रा.फौजिया खान यांचा परभणी जिल्हा दौरा

परभणी, दि.20 : सामान्‍य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, सांस्‍कृतिक
कार्य, राजशिष्‍टाचार, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, सार्वजनिक आरोग्‍य व
कुटुंब कल्‍याण व अल्‍पसंख्‍याक विकास (औकाफसह) राज्‍यमंत्री प्रा. फौजिया खान
ह्या परभणी जिल्‍ह्याच्‍या दौ-यावर येत आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 23 एप्रिल 2012 रोजी सकाळी 11 वाजता
संपर्क कार्यालयात परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्‍या
राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्‍या सदस्‍यांचे स्‍वागत व चर्चा, दुपारी 1 वाजता
संपर्क कार्यालयात परिवर्तन प्रकल्‍प परभणीबाबत चर्चा, दुपारी 2 वाजता राखीव,
सायंकाळी 5 वाजता संपर्क कार्यालयात क्‍वीन्‍स आय.टी.डी.सी. व क्‍वीन्‍स
स्‍कूल बैठक, सांयकाळी 6.30 वाजता संपर्क कार्यालयात क्‍वीन्‍स डी.एड्.,
क्‍वीन्‍स बी.एड्. व क्‍वीन्‍स ज्‍युनिअर महाविद्यालयाची बैठक, रात्री 7.30
वाजता परभणी निवासस्‍थानी राखीव. दिनांक 24 एप्रिल 2012 रोजी सकाळी
9 वाजता संपर्क कार्यालयात त्रिधारा शुगर्स लि. साखर कारखान्‍याच्‍या सदस्‍य व
कर्मचा-यांसमवेत चर्चा, सकाळी 11 वाजता जिल्‍हा‍धिकारी कार्यालयात
मराठवाड्यातील प्रलंबीत अंगणवाडी विद्यार्थ्‍यांची ह्दय शस्‍त्रक्रियाबाबत
आढावा बैठक, दुपारी 1.30 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात सामान्‍य
रुग्‍णालयाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेबाबत आढावा बैठक, दुपारी 2 वाजता
निवासस्‍थानाकडे प्रयाण, दुपारी 2.30 वाजता परभणी निवासस्‍थानी आगमन व राखीव,
दुपारी 4 वाजता औरंगाबादकडे प्रयाण.
0000000000 26 एप्रिल रोजी जिल्‍हा दक्षता
व नियंत्रण समितीची बैठकपरभणी, दि.20 : जिल्‍हा दक्षता व नियंत्रण समितीची
बैठक दिनांक 26 एप्रिल 2012 रोजी दुपारी 4 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात
आयोजित करण्‍यात आली आहे. यासंदर्भात जिल्‍ह्यातील अत्‍याचार पिडीत
मागासवर्गीयांच्‍या तक्रारी असल्‍यास सहायक आयुक्‍त, समाजकल्‍याण यांच्‍याकडे
लेखी स्‍वरुपात सादर कराव्‍यात अथवा सदर सभेच्‍या वेळी प्रत्‍यक्ष सादर
कराव्‍यात, असे सहायक आयुक्‍त समाजकल्‍याण यांनी कळविले
आहे.
00000000000000 मानसशास्‍त्रीय चाचणी कार्यक्रमाचे
आयोजनपरभणी, दि.20 : जिल्‍ह्यातील इयत्‍ता दहावी व बारावीच्‍या
विद्यार्थ्‍यांसाठी पुढील अभ्‍यासक्रमाची निवड करण्‍यासाठी विभागीय व्‍यवसाय
मार्गदर्शन अधिकारी, विभागीय व्‍यवसाय मार्गदर्शन व निवड संस्‍था, औरंगाबाद व
शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) जिल्‍हा परिषद, शिक्षण विभाग परभणी यांच्‍या
संयुक्‍त विद्यमाने मानसशास्‍त्रीय चाचणी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले
आहे. सदर कार्यक्रम एप्रिल ते मे या कालावधीत बालविद्या मंदीर, नानलपेठ परभणी
आणि नूतन विद्यालय सेलू येथे आयोजित करण्‍यात येणार असून याकरीता
विद्यार्थ्‍यांनी नाव नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या कार्यक्रमातून तज्‍ज्ञ
समूपदेशक मानसशास्‍त्रीय चाचण्‍यांच्‍या आधारे विद्यार्थी व पालकांना समूपदेशन
करणार आहेत. या कार्यक्रमात मुलाखत, बुध्‍दीमत्‍ता चाचणी, अभियोग्‍यता चाचणी,
अभिरूची शोधिका व समायोजन शोधिका चाचणीद्वारे पुढील अभ्‍यासक्रम निवडीसाठी
मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. विद्यार्थ्‍यांनी नाव नोंदणी व अधिक
माहितीसाठी पी. एम. सोनोने, बालविद्या मंदीर परभणी 9422178101, बी. बी.
कुलकर्णी, सुमनताई गव्‍हाणे विद्यालय परभणी 7588347600, पी. एम. कुरुंदकर,
नूतन कन्‍या कनिष्‍ठ महाविद्यालय सेलू 9326249850 आणि आर. जी. मखमले, नूतन
विद्यालय सेलू 9422878253 यांच्‍याशी संपर्क करण्‍याचे आवाहन शिक्षणाधिकारी
(मा.) आर. बी. गिरी, विभागीय व्‍यवसाय मार्गदर्शन अधिकारी यू. टी. सरदार यांनी
केले आहे.
--

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट