parbhani-पाणी टंचाई संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निवारण करा - मुख्य कार्यकारी अधिकारी


पाणी टंचाई संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निवारण करा - मुख्य कार्यकारी
अधिकारी

परभणी, दि.16 :
जिल्‍ह्यातील सध्‍याची पाणी टंचाई लक्षात घेऊन गाव, वाडी आणि वस्‍त्‍यांकडून
टंचाई संदर्भात पंचायत समितीकडे आलेल्‍या तक्रारींचे निवारण गटविकास अधिकारी व
उपअभियंत्‍यांनी तात्‍काळ करावे, अशा सुचना जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी
अधिकारी एन. पी. मित्रगोत्री यांनी आढावा बैठकीदरम्‍यान दिल्‍या.
जिल्‍ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्‍यासाठी जानेवारी 2012 ते मार्च 2012 या
कालावधीत संभाव्‍य पाणी टंचाई निवारणार्थ 296 गावात व 75 वाड्या/तांडा करीता
194.96 लक्ष रुपयांचे तसेच एप्रिल 2012 ते जून 2012 या कालावधीतील संभाव्‍य
पाणी टंचाई निवारणार्थ 570 गावात व 154 वाड्या/तांडा करीता 422.72 लक्ष
रुपयांचा अराखडा शासनाकडे सादर करण्‍यात आला आहे. जिल्‍ह्यातील सध्‍या
परिस्थिती व पाणी टंचाई जाणून घेण्‍यासाठी दि.3 ते 12 एप्रिल या दरम्‍यान
जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्‍या उपस्थितीत
तालुका स्‍तरावर बैठका घेण्‍यात आल्‍या. यावेळी सेलू, पाथरी, मानवत, परभणी व
जिंतूर या तालुक्‍यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे टंचाई संदर्भातील पुरक
आराखडे सादर केले आहेत. शिवाय यापुढे पंचायत समितीकडे टंचाई संदर्भात आलेल्‍या
तक्रारींचे गटविकास अधिकारी व उप‍अभियंत्‍यांनी दोन दिवसात निवारण करावे, अशा
सुचना मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्‍या आहेत. सध्‍या
जिल्‍ह्यातील 97 गावे व 52 वाडयांना विहीर व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा
केला जात आहे. शिवाय यापुढील कालावधीत अन्‍य प्रस्‍ताव वेळोवेळी मंजुर करून
कार्यवाही करावी, असेही ते
म्‍हणाले. 000000000000
मध्‍यम प्रकल्‍पात 19 तर लघु प्रकल्‍पात 11 टक्‍के पाणीसाठा परभणी, दि.
16 : जिल्‍ह्यातील मध्‍यम प्रकल्‍पात 9.940 दलघमी तर लघु प्रकल्‍पात 04.761
दलघमी पाणीसाठा उपलब्‍ध आहे. जिल्‍ह्यात 2 मध्‍यम तर 22 लघु असे
एकूण 24 प्रकल्‍प आहेत. मध्‍यम प्रकल्‍पाची पूर्ण जल क्षमता 20.800 असून
यापैकी मध्‍यम प्रकल्‍पात 9.940 दलघमी पाणीसाठी उपलब्‍ध आहे. ही टक्‍केवारी 19
आहे. तर लघु प्रकल्‍पाची पूर्ण जल क्षमता 6.884 असून यापैकी 04.761 दलघमी
पाणीसाठा उपलब्‍ध आहे. ही टक्‍केवारी
11आहे. 0000000000000

अंगणवाडीसाठी खाऊ पुरवठादारांची 19 एप्रिल रोजी बैठक परभणी, दि. 16 :
परभणी जिल्‍हा अंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडीतील बालकांना दूध, अंडी, केळी,
शेंगदाणे, बटाटे, गूळ, खजूर, चणे, फुटाणे आदी 10 वस्‍तुंचा पुरवठा अंगणवाडी
स्‍तरावर करण्‍यासाठी निविदा मागविण्‍यात येणार आहेत. यासाठी जिल्‍हा स्‍तरावर
जिल्‍हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठीत
करण्‍यात आली असून दिनांक 19 एप्रिल 2012 रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा परिषद
सभागृहात सर्व स्‍थानिक पुरवठादारांची बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. सदर
बैठकीत निविदेबाबतच्‍या अटी व शर्ती समजावून सांगितल्‍या जाणार आहेत. तरी
पुरवठादारांनी बैठकीस उपस्‍थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा परिषद उप मुख्‍य
कार्यकारी अधिकारी श्री. नीला यांनी केले
आहे. 000000000000

--

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट