भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक


परभणी, दि.29 : येत्‍या गुरुवार दिनांक 31 मे रोजी दुपारी 12.30
वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हा‍स्‍तरीय भ्रष्‍टाचार निर्मूलन समितीची
बैठक आयोजीत करण्‍यात आली आहे. भ्रष्‍टाचार संबंधाने पुराव्‍यानिशी तक्रारी
जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष, जिल्‍हा भ्रष्‍टाचार निर्मूलन समिती, परभणीच्‍या
नावाने दाखल करता येतील, असे कळविण्‍यात आले
आहे. -*-*-*-*-*-
युवा जागृती कार्यक्रमांचे क्रीडाधिकारी कार्यालयाकडून आयोजन
परभणी, दि.29 : येथील जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्‍यावतीने 31 मे रोजी
तंबाखू विरोधी दिन व 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्‍यात येणार आहे.
त्‍यासाठी स्‍वंयसेवी संस्‍था मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार
आहे. राज्‍याच्‍या विकासात युवांचा महत्‍त्‍वाचा वाटा आहे.
युवांमध्‍ये निरोगी जीवनाचे महत्‍व जागवून भावी आयुष्‍य निरोगी होणे आवश्‍यक
आहे. निरोगी राहण्‍याचा मूलमंत्र युवांच्‍या मनावर बिंबवणे आवश्‍यक आहे.
जागतिकीकरणाची स्‍पर्धा त्‍यामध्‍ये स्‍वत:चे स्‍थान मिळविण्‍याची आंतरीक
क्षमता तसेच शिक्षण /नौकरी, व्‍यवसाय यामधील स्‍पर्धात्‍मक वातावरण त्‍यामुळे
युवांमध्‍ये मानसिक ताणतणाव वाढून नैराश्‍य निर्माण होवू नये. यासाठी युवांना
सकारात्‍म्‍क जीवनशैलीची ओळख करुन देणे आवश्‍यक आहे. धुम्रपान
व्‍यसनाधिनतेमुळे शारिरीक व मानसिक आरोग्‍याची हानी होणार नाही. यासाठी 31 मे
या तंबाखु विरोधी दिनाचे औचित्‍य साधून युवा विकासाचे कार्य करणा-या
संस्‍थाच्‍या समन्‍वयाने तंबाखु, धुम्रपान विषयाचे चर्चासत्राचे आयोजन
कार्यालयाच्‍यावतीने करण्‍यात येणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण व
संवर्धन हे जिवनमालेचा दर्जा समतोल ठेवण्‍यासाठी आवश्‍यक आहेत. पर्यायाने
पर्यावरण विषयक उपक्रमामध्‍ये युवकांच्‍या सकारात्‍मक सहभाग वाढविणे आवश्‍यक
आहे. यानिमित्‍ताने पयावरणाबाबत जागृती निर्माण करण्‍यासाठी स्‍वंयसेवी
संस्‍थाच्‍या माध्‍यमातून पर्यावरण विषयक उपक्रमांतर्गत वृक्षारोपन या
कार्यक्रमाचे आयोजन कार्यालयाच्‍यावतीने करण्‍यात येणार आहे. जास्‍तीत जास्‍त
स्‍वंयेसवी संस्‍थानी यामध्‍ये आपला सहभाग नोंदवून सदर उपक्रमास सहकार्य
करावे, असे आवाहन करण्‍यात आले
आहे. -*-*-*-*-*-
क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍याद्वारे थेट
प्रवेश परभणी, दि.29 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे
संचलित शिव छत्रपती क्रीडापीठाअंतर्गत राज्‍यात सुरु असलेल्‍या विविध 11
क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये क्रीडा नैपुण्‍य चाचण्‍यांद्वारे व सरळ प्रवेश
प्रक्रियेद्वारे थेट प्रवेश देण्‍यात येतो. सन 2012-13 यावर्षात राष्‍ट्रीय
शालेय क्रीडा स्‍पर्धेत किवा एकविद्य खेळ संघटनेद्वारे 14 व 17 वर्षाखालील
गटात राष्‍ट्रीय स्‍पर्धेत सहभागी झालेल्‍या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीराचे
आयोजन करण्‍यात येत आहे. शिवछत्रपती क्रीडापीठा अंतर्गत क्रीडा
प्रबोधिनी पुणे व इतर 10 जिल्‍ह्यात सुरु असलेल्‍या क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये
मान्‍यता देण्‍यात आलेल्‍या 1) अथलेटीक्‍स 2) आर्चरी (मुले) 3) ज्‍युदो 4)
जलतरण 5) ड्रायव्‍हींग 6) कुस्‍ती (मुले) 7) सायकलींग 8) फुटबॉल (मुले) 9)
हॉकी 10) हॅन्‍डबॉल (मुले) 11) शुटींग 12) जिम्‍नॅस्‍टीक 13) बॉक्‍सींग (मुले)
14 बॅडमिंटन (मुले) 15) टेबलटेनिस 16) वेटलिफ्टींग या खेळासाठी सरळ
प्रवेशाद्वारे खेळनिहाय चाचण्‍या घेवून खेळाडूंची निवड करण्‍यात येणार
आहे. या प्रशिक्षण शिबीरात 14 ते 17 वर्षाखालील गटामध्‍ये ज्‍या
मुला-मुलींनी महाराष्‍ट्र राज्‍याचे प्रतिनिधीत्‍व शालेय, राष्‍ट्रीय
स्‍पर्धेत किंवा एकविद्य खेळाच्‍या संघटनेद्वारे आयोजीत राष्‍ट्रीय
स्‍पर्धेमध्‍ये केलेले आहे. किंवा प्राविण्‍य प्राप्‍त केलेले आहे. अशा
खेळाडूंना सहभागी केले जाणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीरामध्‍ये खेळाडूंचे
कौशल्‍य गुण पाहून क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये सरळ प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश
देण्‍यात येणार आहे. जे खेळाडू क्रीडा प्रबोधिनीमध्‍ये प्रवेश घेवू इच्छितात,
अशा खेळाडूंनी संबंधित खेळाच्‍या प्रशिक्षण शिबीराकरीता दि.03 जून 2012 रोजी
सायंकाळी 05 वाजेपर्यंत आपल्‍या मूळ प्रमाणपत्रासह (प्राविण्‍य प्रमाणपत्र,
वयाचा दाखला) उपस्थित राहावे. अधिक माहितीकरीता शिवछत्रपती क्रीडापीठ
म्‍हाळुंगे बालेवाडी, पुणे -45 कार्यालयाशी 020-27390236, 020-27390234 या
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले
आहे. -*-*-*-*-*-

माजी न्‍यायमूर्ती थूल 3 जूनला परभणीत परभणी, दि.29 : महाराष्‍ट्र
राज्‍य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्‍य (विधी) माजी न्‍यायमूर्ती सी.एल.
थूल हे 3 जून रोजी परभणी जिल्‍ह्यात येत आहेत. त्‍यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे. 3 जून सकाळी 7 वाजता आगमन, सकाळी 11 वाजता सामाजिक न्‍याय
विभागाच्‍यावतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थिती व सामाजिक न्‍याय
विभागाच्‍या योजनांबाबत मार्गदर्शन, दुपारी 3.30 वाजता परभणीहून नांदेडकडे
प्रयाण.
-*-*-*-*-*-

शिधा पत्रिकांची तपासणी मोहीम 1 जूनपासून – जिल्‍हाधिकारी परभणी, दि.29 :
परभणी जिल्‍ह्यामध्‍ये केरोसीन मिळण्‍यास पात्र ठरणा-या सर्व शिधापत्रिकांची
तपासणी मोहीम 1 जून ते 31 ऑगस्‍ट या कालावधीत राबविण्‍यात येणार असल्‍याची
माहिती जिल्‍हाधिकारी डॉ.शालीग्राम वानखेडे यांनी दिली. वाढत्‍या गॅस
कनेक्‍शनची संख्‍या लक्षात घेता केंद्र शासनाकडून राज्‍य शासनास प्राप्‍त
होणारे केरोसीन नियतन उत्‍तरोत्‍तर कमी आहे. उपलब्‍ध होणारे केरोसीन हे केवळ
पात्र शिधापत्रिकाधारकांनाच वितरीत करणे शक्‍य व्‍हावे यासाठी परभणी
जिल्‍ह्यामध्‍ये केरोसीन मिळण्‍यास पात्र ठरणा-या सर्व शिधापत्रिकाची तपासणी
प्रत्‍यक्ष गृहभेटी देवून तसेच कार्यक्षेत्रात वितरीत गॅस कनेक्‍शनच्‍या आधारे
केरोसीन नियतन निर्धारीत करण्‍याची विशेष मोहिम दिनांक 01 जुन 2012 ते 31
ऑगस्‍ट 2012 या तीन महिन्‍याच्‍या कालावधीत राबविली जाईल असे ते म्‍हणाले.
प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये तपासणी पथके गठीत करण्‍यात आली असून, तपासणी पथक
त्‍या कार्यक्षेत्रातील सर्व शिधापत्रिकाधारकांच्‍या निवासस्‍थानी भेट देवुन
कुटुंबातील व्‍यक्‍तींची संख्‍या तसेच गॅस कनेक्‍शनबाबतची माहिती या
मोहिमेअंतर्गत तपासून खात्री करणार आहेत, शिधापत्रिकाची /गॅस कनेक्‍शन विषयीची
तपासणी करण्‍यासाठी आलेल्‍या पथकास आपल्‍याकडील शिधापत्रिका तसेच असलेल्‍या
गॅस कनेक्‍शन बाबतची माहिती देण्‍यात यावी. तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकाकडे
अद्यापही कोणत्‍याही प्रकारचे गॅस कनेक्‍शन नाही अशा शिधापत्रिकाधारकांच्‍या
घरातील व्‍यक्‍तींची संख्‍या नोंदविण्‍यात यावी, असे आवाहन करण्‍यात आले
आहे. -*-*-*-*-*-

प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशाचे आवाहन परभणी, दि.29 : औरंगाबाद येथील
शासकीय प्रौढ प्रशिक्षण केंद्र एन 12 हडको या संस्‍थेत सन 2012-13 या शैक्षणिक
वर्षासाठी प्रौढ अस्थिव्‍यंगांना प्रवेश देणे आहे. या संस्‍थेत शिवणकला,
आर्मेचर वायडींग (विद्युत), हस्‍त जुळाई व छपाई पुस्‍तक बांधणी तसेच सर्व
प्रशिक्षणार्थीसाठी फिटर या व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.
शिवणकला व पुस्‍तक बांधणीसाठी चौथी उत्‍तीर्ण व हस्‍तजुळाई व छपाई तसेच
आर्मेचर वायडिंग (विद्युत) साठी उमेदवार 9 वी उत्‍तीर्ण असावा. या संस्‍थेत वय
16 ते 45 या वयोगटातील अस्थिव्‍यंगानाच प्रवेश दिला जातो. अंध, मुकबधीर,
मतीमंद या प्रवर्गातील मुलांना प्रवेश दिला जात नाही. प्रवेशित
प्रशिक्षणार्थांना निवास, भोजन, अंथरुन, पांघरुन व शैक्षणिक साहित्‍य,
विद्यावेतन, वैद्यकिय औषधोपचार इ. सोय विनामुल्‍य करण्‍यात येते. गरजुंनी
प्रत्‍यक्ष किंवा पत्राद्वारे या संस्‍थेस संपर्क साधुन प्रवेश अर्ज प्राप्‍त
करुन घ्‍यावेत. विहीत नमुन्‍यातील प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस
वगळुन दिनांक 01 जून 2012 पर्यंत विनामुल्‍य मिळतील. प्रवेश अर्ज
स्‍वीकारण्‍याची अंतिम तारीख 30 जून 2012 ही आहे. वेळेअभावी प्रवेश अर्ज
मागविण्‍यास अडचण निर्माण झाल्‍यास उमेदवारांनी साध्‍या कागदावर स्‍वत:चे
संपूर्ण नांव, वय, पूर्ण पत्‍ता, शिक्षण, मिळालेले गुण, रहीवासी, अपंगत्‍व इ.
उल्‍लेख करुन त्‍यासोबत संबंधित प्रमाणपत्राच्‍या छायांकित प्रमाणित प्रतीसह
अर्ज करावा. 1) अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र, 2) शाळा सोडल्‍याचा दाखला, 3) रहिवासी
प्रमाणपत्र, 4) पालकाचा उत्‍पन्‍नाचा दाखला, 5) इयत्‍ता 4 थी /इयत्‍ता 9 वी
पासचे गुण पत्रक इत्‍यादी. असे अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण
केंद्र, एन-12 हडको, औरंगाबाद यांनी कळविले
आहे. -*-*-*-*-*-

शासकीय वस्‍तीगृह प्रवेशाबाबत आवाहन परभणी, दि.29 : औरंगाबाद येथील आदिवासी
मुलींचे शासकीय वस्‍तीगृह (विभागीय स्‍तर) ज्‍युबली पार्क, येथे नविन
वस्‍तीगृह सुरु झाले आहे. वस्‍तीगृहात राहण्‍याची पात्रता इयत्‍ता 11 वी पासून
ते पदव्‍युत्‍तर विविध अभ्‍यासक्रमांमध्‍ये प्रवेश देण्‍याची प्रक्रिया सुरु
झालेली आहे. सदर शासकीय मुलींच्‍या वस्‍तीगृहामध्‍ये शासनामार्फत निवास, भोजन,
अभ्‍यासक्रमिक पुस्‍तके, स्‍टेशनरी, आंथरुन-पांघरुण व निर्वाहभत्‍ता मोफत
पुरविण्‍यात येतात. पात्र विद्यार्थीनींनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन
करण्‍यात आले आहे. अधिक माहितीसाठी गृहप्रमुख, आदिवासी मुलींचे शासकीय
वस्‍तीगृह, ज्‍युबली पार्क, औरंगाबाद, प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्‍प, औरंगाबाद, राजमाता जिजाऊ चौक, सिडको एन-8, औरंगाबाद येथे
संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्‍यात आले
आहे. -*-*-*-*-*-

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट