प्रा.फौजिया खान यांचा परभणी जिल्हा दौरा

प्रा.फौजिया खान यांचा परभणी जिल्हा दौरा

परभणी, दि. 1 : सामान्‍य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क,
सांस्‍कृतिक कार्य, राजशिष्‍टाचार, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, सार्वजनिक
आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण व अल्‍पसंख्‍यांक विकास (औकाफसह) राज्‍यमंत्री
प्रा.फौजिया खान परभणी जिल्‍ह्याच्‍या दौ-यावर येत आहेत. त्‍यांचा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दिनांक 3 जून 2012 रोजी सकाळी 10.30 वाजता
औरंगाबादहून परभणीकडे प्रयाण, दुपारी 1.30 वाजता परभणी निवासस्‍थानी आगमन व
राखीव, सायंकाळी 5.30 वाजता राज्‍यमंत्री संपर्क कार्यालयात बैठक, सायंकाळी 7
वाजता राखीव. दिनांक 4 जून 2012 रोजी सकाळी 10 वाजता राज्‍यमंत्री संपर्क
कार्यालयात अभ्‍यागतांसाठी राखीव, सकाळी 11 वाजता क्‍वीन्स स्‍कूल परभणी येथे
मुलाखत कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1 वाजता राखीव, सायंकाळी 5 वाजता
राज्‍यमंत्री संपर्क कार्यालयात बैठक, सायंकाळी 7 वाजता राखीव. दिनांक 5 जून
2012 रोजी सकाळी 6.45 वाजता परभणी निवासस्‍थानाहून नांदेडकडे
प्रयाण. 000000000

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट