जात पडताळणी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जात पडताळणी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

परभणी, दि.31 : सन 2011-12 या शैक्षणिक वर्षात इयत्‍ता 12 वी
विज्ञान शाखेत शिकत असलेल्‍या तसेच या पूर्वीच्‍या काळात इयत्‍ता 12 वी
विज्ञान शाखेत उत्‍तीर्ण झालेल्‍या मागासवर्गीय (अनुसूचित जमाती वगळून)
विद्यार्थ्‍यांनी विहित मुदतीत जात पडताळणी प्रस्‍ताव सादर केलेले नाहीत. सदर
विद्यार्थ्‍यांचे खालील प्रमाणे वाढीव मुदतीत प्रस्‍ताव सादर करण्‍यास्‍तव
सहायक आयुक्‍त, समाजकल्‍याण यांनी कळविले आहे. जे विद्यार्थी सन
2011-12 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्‍या इयत्‍ता 12 वी मध्‍ये शिकत
आहेत, त्‍यांनी संबधित महाविद्यालयामार्फत आपले अर्ज संस्‍थेच्‍या
प्राचार्यांकडे 15 जून पर्यत सादर करावयाचे आहेत. शैक्षणिक संस्‍थेने असे
प्रस्‍ताव संबधित विशेष जिल्‍हा समाजकल्‍याण अधिकारी (सहायक आयुक्‍त,
समाजकल्‍याण) यांच्‍याकडे 22 जून 2012 पर्यंत पाठवायचे आहेत. विशेष जिल्‍हा
समाजकल्‍याण अधिकारी (सहायकआयुक्‍त, समाजकल्‍याण) यांनी संबधित विभागीय जाती
प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 30 जून 2012 पर्यंत पाठवावयाचे
आहेत.
-*-*-*-*-*-

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट