खरिपाचे उद्दीष्ट बँकांनी 31 जुलैपर्यंत पूर्ण करावे - पालकमंत्री प्रकाश

खरिपाचे उद्दीष्ट बँकांनी 31 जुलैपर्यंत पूर्ण करावे - पालकमंत्री प्रकाश
सोळंके


परभणी, दि. 14 : खरीप हंगाम
हा शेतक-यांसाठी महत्‍त्‍वाचा आहे. पीक कर्जाबाबत शेतक-यांच्‍या अनेक तक्रारी
येत आहे. बँकांनी शेतक-यांना वेळेवर कर्ज उपलब्‍ध करून देणे गरजेचे असून
जिल्‍ह्यातील बँकांनी खरिपाचे उद्दीष्‍ट 31 जुलैपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना
पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित
खरीप हंगाम पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ.
शालीग्राम वानखेडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी विश्‍वंभर गावंडे, अतिरिक्‍त
मुख्‍य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, अग्रणी बँकेचे व्‍यवस्‍थापक अनिल गोटे,
जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी कुडमूलवार, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर,
जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष समशेर वरपूडकर, विजय भांबळे आदी उपस्‍थित होते.
बँकेबाबत शेतक-यांच्‍या तक्रारी येऊ देऊ नका. इतर जिल्‍ह्यांच्‍या तुलनेत
परभणी जिल्‍ह्याचा खरीप क्रेडीट प्‍लान कमी आहे. तो वाढविण्‍यासाठी नियोजन
करून जिल्‍हाधिका-यांनी याचा पाठपुरावा करावा. खरीप हंगामात बँकांना दिलेले
उद्दीष्‍ट त्‍वरीत पूर्ण करून प्रत्‍येक शेतक-यांपर्यंत बँकांनी पोहचले
पाहिजे, असे ते म्‍हणाले. तसेच शेतक-यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्‍ध
होण्‍यासाठी वाटप प्रक्रिया गांभिर्याने राबवावी. बियाणे आणि खतांची जादा
दराने विक्री होत असेल तर जिल्‍हा प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे आदेश
पालकमंत्री सोळंके यांनी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्‍ह्यात पडलेला
पाऊस, खते आणि बियाणांचा उपलब्‍ध साठा, त्‍याचे आवंटन, पेरण्‍यांची स्‍थिती
आदीबाबत माहिती जाणून घेतली. बैठकीला विविध बँकांचे अधिकारी तसेच कर्मचारी
उपस्‍थित होते.
00000000000000वृत्‍त क्रमांक : 442विकास कामांचा निधी वेळेवर खर्च
करा - पालकमंत्री प्रकाश
सोळंकेपरभणी, दि. 14 : जिल्‍हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना विकास
कामांसाठी निधी उपलब्‍ध करून दिला जातो. मात्र हा निधी खर्च होत नसल्‍याची बाब
उघडकीस आली आहे. त्‍यामुळे आपल्‍या खात्‍याला मिळालेला निधी विकास कामांवर
वेळेवर खर्च करावा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी
दिले.जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या आढावा
बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, पोलीस
अधीक्षक मैथिली झा,निवासी उपजिल्‍हाधिकारी विश्‍वंभर गावंडे,अतिरिक्‍त मुख्‍य
कार्यकारी अधिकारी धनराज नीला, जिल्‍हा नियोजन अधिकारी एम. जी. बेग, सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एन. पटवेकर,भूसंपादन अधिकारी डॉ.
प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण धरमकर, जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष
समशेर वरपूडकर, विजय भांबळे आदी उपस्‍थित होते. यावेळी पालकमंत्री सोळंके
यांनी जिल्‍हा वार्षिक योजना 2011-12 व 2012-13 चा आढावा घेतला. तसेच परभणीतील
वळण रस्‍त्‍याबाबत भूसंपादनाची सद्यस्‍थिती, जिंतूर तालुक्‍यातील हिवरखेडा
येथील साठवण तलाव बांधकामाची परिस्‍थिती जाणून घेतली. बैठकीला नांदेड
पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चाटे, उपजिल्‍हाधिकारी शोभा राऊत,
तहसीलदार ज्‍योती पवार आदी उपस्‍थित
होते. 00000000000

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट