परभणी जिल्‍हा माहिती कार्यालय

जिल्हा माहिती कार्यालय, परभणी
29 जून रोजी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा
परभणी, दि. 26 : जिल्‍हा भ्रष्‍टाचार निर्मूलन समितीची सभा दिनांक 29 जून 2012
रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्‍यात आली आहे.
सभेला संबधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्‍यात आले
आहे.
0000000000वृत्‍त क्रमांक : 394निवृत्‍ती वेतन धारकांचा मेळावा संपन्‍न परभणी,
दि. 26 : जिल्‍ह्यातील निवृत्‍ती वेतन धारकांच्‍या अडीअडचणींबाबत निवृत्‍ती
वेतन भवनात मेळावा घेण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रभारी
कोषागार अधिकारी डी.जी.भांगे तर प्रमुख अतिथी म्‍हणून मराठवाडा सेवानिवृत्‍ती
सेवा संघ परभणीचे अध्‍यक्ष दिगांबरराव मोहिते, उपाध्‍यक्ष साडेगावकर, सचिव
वैध, अप्‍पर कोषागार अधिकारी बोंदरे उपस्थित होते. या वेळी निवृत्‍ती वेतन
धारकाच्‍या अडीअडचणीबाबत चर्चा करण्‍यात आली. दिनांक 7 सप्‍टेंबर 2012, 10
डिसेंबर 2012 व 8 मार्च 2013 रोजी पुढील बैठक घेण्‍यात येईल. या बैठकीला
जास्‍तीत जास्‍त संख्‍येने निवृत्‍ती वेतनधारकांनी राहावे, असे आवाहन कोषागार
अधिकारी भांगे यांनी केले. कार्यक्रमाला पी.के. देशमाने, पी.व्‍ही.गोविंदवार,
व्‍ही.एस.सेवलीकर, अविनाश दुधारे यांच्‍यासह निवृत्‍ती वेतनधारक उपस्थित
होते. 00000000000 वृत्‍त
क्रमांक : 395राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली अर्पण परभणी,
दि.26 : राजर्षी शाहू महाराज यांच्‍या जयंतीनिमित्‍त राजर्षी शाहू महाराज
यांना जिल्‍हाधिकारी कार्यालयात आदरांजली अर्पण करण्‍यात आली. जिल्‍हाधिकारी
डॉ. शालीग्राम वानखेडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्‍या प्रतिमेला
माल्‍यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी बी.बी.चव्‍हाण,
निवासी उपजिल्‍हाधिकारी विश्‍वंभर गावंडे तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि
कर्मचारी उपस्‍थित होते.
000000000

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट