सर्कलनिहाय दुष्काळग्रस्त भागांच्या नोंदी घ्याव्यात! : वरपूडकर


जिल्ह्यातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यातील ८६ विहिरींच्या नोंदी बायोमॅट्रीक मीटरने घेतल्या जातात. या नोंदीतही विसंगती दिसते. सिंचन प्रकल्पात पाणी नाही, जमिनीतही पाणी नाही. जमिनीच्या पाणी पातळीची महसूल सर्कलनिहाय नोंदी घेऊन जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४४ टक्के पाऊस झाला. सध्या जरी पाणीपा
तळी १ मीटरने खालावली असली तरी उन्हाळ्यामध्ये ही पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता दुष्काळ जाहीर करुन जिल्ह्यात जलसंधारणाची कामे वाढवावी. कोल्हापुरी, सिमेंट बंधारे आणि शेततळे घेण्यासाठी भरीव मदत आम्ही शासनाकडे मागणार आहोत. तसेच कापूस, सोयाबीनच्या अनुदानाचे वाटप झाल्यास दुष्काळी स्थितीत शेतकर्‍यांना हे पैसे कामाला येतील. त्यामुळे या अनुदानाचे तत्काळ वाटप करावे, अशी मागणी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

by-pravin patil
 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट