जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा..

परभणी जिल्हा हा रबीचा जिल्हा असून, सध्याची पाण्याची परिस्थिती लक्षात घेतली तर जिल्ह्यातील रबीचा हंगाम धोक्यात आहे. त्यामुळे निकष बदलून परभणी जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.
इंग्रजांच्या काळापासूनची नजर आणेवारी आजही लागू आहे. पूर्वी जमीन जास्त आणि लोकसंख्या कमी होती. सध्याची परिस्थिती उलट आहे. जमिनी कमी होऊनही अन्नधान्य भरपूर आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करताना निकष बदलावा लागेल. जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.
जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्‍वर, निम्न दुधना, मासोळी, करपरा आदी प्रकल्पातील जलसाठा मृतसाठय़ात आहे. जिल्ह्यात खरीपापेक्षा रबीचे क्षेत्र जास्त आहे. सध्याची स्थिती पाहता रबीचा हंगाम धोक्यात आहे. त्याचप्रमाणे बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे.
बागायती पिकांना पाणी जास्त लागते. परंतुच पाणीच उपलब्ध नसल्याने बागायाती क्षेत्रही धोक्यात आहे. जिल्ह्यातील पावसाच्या नोंदी घेताना विसंगती दिसतात. त्यामुळे मंडळनिहाय निकष ग्राह्य धरुन दुष्काळी भागाला न्याय मिळेल.
या सर्व बाबींचा विचार करता जिल्ह्यात दुष्काळजाहीर करावा, अशी मागणी परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना करण्यात आली
by-pravin patil

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट