सावधान ! राजकीय चेहऱ्याने दहशतवाद येतोय !


स्रोत: NewsBharati Marathi      तारीख: 10/30/2012

पुण्यातल्या स्फोटाच्या प्रकरणात नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे एक  खतरनाक अतिरेकी मकबूल हाजीमिया याला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केले. मराठवाड्यात असा अतिरेकी पकडणे हे नवीन नाही. मात्र यावेळी हा अतिरेकी मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन या राजकीय पक्षाचा धर्माबादचा अध्यक्ष आहे. एमआयएम यानावाने हा राजकीय पक्ष हैदराबादहून आता मराठवाड्यात फोफावतो आहे. नुकतेच झालेल्या नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाचे तब्बल ११ नगरसेवक निवडून आले आहेत. तोंडी मुस्लिमांच्या हिताची भाषा जरी या पक्षाचे नेते करत असले तरी सरळ सरळ दहशतवादाला राजकीय चेहरा देण्याचा हा प्रयत्न आहे. या पक्षाचा इतिहास पाहिला की यांची जातकुळीं काय आहे ते सहज लक्षात येते.

ऑगस्टमध्ये पुण्यात जंगली महाराज रोडवर सलग चार स्फोट झाले होते. या प्रकरणी जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी नांदेडचा इम्रानखान, संभाजीनगरचा (औरंगाबाद) असदखान आणि पुण्यातून फिरोजखान इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांना अटक केली होती. या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर या मकबूल हाजीमिया याचे नाव कळाले. सय्यद मकबूल उर्फ जुबेर याने इम्रानखान आणि असदखान यांना औरंगाबादजवळ नायगाव येथे फार्महाऊसवर बाँब बनविण्याचे ट्रेनिंग दिले. या मकबूलला बारा वर्षांपूर्वी पोलिसांनी लष्कर ए तोयबाचा कमांडर अझम घोरीच्या टोळीतील सदस्य या नात्याने अटक केली होती. आंध्र प्रदेशातील बोधन आणि हैदराबाद येथे त्याच्यावर दोन खुनाचे आरोप होते. यापैकी हैदराबादच्या खूनप्रकरणात शिक्षा भोगून तो बाहेर आला आणि पुन्हा इंडियन मुजाहिदीनचे काम करू लागला. यानेच १९९८ साली धर्माबाद येथे स्फोट केला होता. त्या स्फोटाचा पोलिसांनी सखोल तपास न केल्याने याला प्रोत्साहन मिळाले आणि २००० साली नांदेड येथे शारदा चित्रपटगृहात स्फोट घडविला. या प्रकरणात त्याला अटक झाली. कंगवे विकण्याचे काम करत त्याने इंडियन मुजाहिदीनचे काम धर्माबाद येथे केले. हैदराबादचा एमआयएम हा राजकीय पक्ष मराठवाड्यात येताच हा मकबूल या पक्षात  घुसला आणि धर्माबादचा तालुकाध्यक्ष झाला.

मसलिस ए इत्तेहाद उल  मुसलमीन याचा अर्थ मुस्लिमांच्या संघटनांचे फेडरेशन असा होतो. एमआयएमचे जे नाव आहे त्यातील मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन ही संस्था हैदराबादचा निजाम उस्मानअलीखान यानेच आपला नवाब मेहमूद नवाझखान किलेदार याच्याकरवी १९२७ साली स्थापन केली होती. हैदराबादच्या निजामाला उपयुक्त हालचाली समाजात घडवून आणणे हा या संघटनेचा हेतू होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हैदराबादचे संस्थान भारतात विलीन न करता स्वतंत्र ठेवावे आणि वेळ आली तर पाकिस्तानला जोडावे या पंथवेड्या इच्छेने या संस्थानात असलेल्या बहुसंख्य हिदूंची भावना लक्षात न घेता जे कारस्थान रचले गेले त्यावेळी ही संघटनाच रझाकारांच्या माध्यमातून हिदूंवर अनन्वित अत्याचार करून त्यांना संस्थानमधून पळवून लावणे qकवा मारून टाकण्याच्या प्रयत्नात होती.  कारण हैदराबादच्या संस्थानमधील बहुसंख्य हिंदू जनतेचे मत हिंदुस्थानात जाण्याचे होते.  कासिम रझवी हा रझाकारांचा प्रमुख होता. त्याच्या नावावरूनच रझाकार हे नाव पडले होते. दीड लाख रझाकार या कामासाठी धर्मांधतेने हिदूंना मारणे, छळ करणे, लूट करणे, स्वतंत्र भारताच्या बाजुने काम करणाऱ्यांचे खून पाडणे अशा प्रकारच्या कारवाया करत होते. विशेष म्हणजे हा कासीम रझवी हाच या मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचा त्या काळात अध्यक्ष होता. पोलिस अॅतक्शन झाली. हैदराबादचा निजाम शरण आला. रझाकार नामशेष झाले. मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेवर बंदी घातली गेली आणि या संघटनेचा व रझाकारांचा अध्यक्ष कासीम  रझवी हा तुरूंगात गेला. १९४८ ते १९५७ याकाळात या मजलीसवर बंदीच होती. १९५७ मध्ये हैदराबाद येथे एक वकील अब्दुल वाहिद ओवेसी यांनी मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन या नावाला ऑल इंडिया असे दोन शब्द सुरूवातीला जोडले आणि या नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. कायद्याच्या आणि भारतीय लोकशाहीच्या चौकटीत जरी राजकीय पक्ष म्हणून यांनी मान्यता घेतली आणि भाषा समाजाला शैक्षणिक उन्नती आणि विकास यासाठी काम करण्याची असली तरी मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन हे नाव वापरण्यामागे हैदराबाद संस्थानमध्ये रझाकारांची जी वृत्ती आणि भावना होती तिचे पुनरूज्जीवन करणे हीच वृत्ती होती. आजही अस्तित्वात असलेल्या या वृत्तीला खतपाणी घालून त्याआधारे राजकारण करणे हाच हेतू तेच रझाकाराच्या काळातील नाव वापरण्यामागे असू शकतो. ओवेसी यांच्यानंतर सुलतान  सलाउद्दीन ओवेसी यांनी या पक्षाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी सुरूवातीला आंध्रप्रदेश विधानसभेत आणि नंतर हैदराबादहून लोकसभेत अनेक वर्षे खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा असाउद्दीन ओवेसी हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते खासदार आहेत. आता सध्या या पक्षाचे आंध्र विधानसभेत सात आमदार आहेत. हैदराबाद महापालिकेत ४७ नगरसेवक या पक्षाचे आहेत. नांदेडला प्रथम यांनी आपला पक्ष स्थापन करून चंचूप्रवेश केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष असाउद्दीन ओवेसी यांनी आणि त्या पक्षाच्या अन्य प्रचारकांनी नांदेडच्या महापालिका निवडणुकीत जी आक्रमक भाषा वापरली, जी चिथावणीखोर आवाहने केली ती पाहिली की दिशा आणि धोका स्पष्ट होतो. नांदेडचे निकाल लागल्यावरही भाषा तशीच आहे. दहशतवादी या नावाखाली गावागावात निरपराध मुस्लिम तरूणांना पोलिस पकडून त्रास देत आहेत हा यांचा मुख्य आक्षेप आहे. अशा प्रकारची भाषा वापरूनच यांनी नांदेडमध्ये काँग्रेसचा मतदार असलेला मुस्लिम मतदार आपल्या पक्षाकडे वळविला आहे. मात्र आता मकबूलच्या अटकेनंतर यांचा हा दावा खोटा ठरला आहे. राजकीय आश्रय मिळताच हे दहशतवादी वृत्तीचे लोक कसे आक्रमक बनतात आणि व्यवस्थेवर जनतेवर कसा दबाव टाकतात याचे हा मकबूल हाजीमिया एक जबरदस्त उदाहरण आहे. दोन खुनाचे आरोप आणि एका स्फोटाच्या कटात सहभाग असलेला हा खतरनाक अतिरेकी याच्यावर गणेशोत्सवात तडीपारीची कारवाई करण्यात येणार होती. मात्र हा फरार झाला. याने धर्माबादचे पोलिस निरीक्षक कोळेकर यांना मी खुँखार अतिरेकी आहे माझ्या व माझ्या खानदानच्या वाटेला जाल तर बघून घेईन अशी धमकी दिली होती.

मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन हा राजकीय पक्ष मराठवाड्यात दहशतवादचे पोशिंदे असल्यासारखे भासवतो आहे त्यामुळे या राजकीय पक्षाच्या नावाखाली दहशतवादी कारवाया करणाèया मकबूलसारख्या लोकांचे धैर्य वाढते आहे. प्रशासन, अधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. सत्ताधाऱ्यांनी, राजकीय पक्षांनी, विचारी मुस्लिमांनी या एमआयएमला किती थारा द्यायचा याचा जरा शहाणपणाने आणि संयमाने विचार केला पाहिजे. तपास यंत्रणांनी या लोकांवर बारीक लक्ष ठेवून त्यांच्या राजकीय स्थितीचा विचार न करता त्यांच्या देशद्रोही कारवायांना चाप लावलाच पाहिजे. हा धोकादायक प्रकार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

 

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट