mcpathri,mc pathri,pathriपाथरी नगर पालिका झाली ऑन लाईन

पाथरी नगर पालिका झाली ऑन लाईन

माहिती तंत्र काळात इंटरनेट हे खरेच वरदान ठरले आहे ,प्रकाशाच्या वे
गाणे वाढणार्या इंटरनेट वापरणार्यांची संख्या त्याहून अधिक वेगाणे
मिळणारी माहिती समाजात जागरूकता आणि व्यवहारात पारदर्श कता आणू पाहण्याचा
यशस्वी प्रयत्न करत आहे ,ई शासन हि सरकारी तंत्र योजना जनतेच्या
,किंबहुना तरुण भारताच्या अधिकाधिक फायद्याची आहे .असाच एक बदल पाथरी
शहरात घडला आहे.आज २६/१/२०१३ ला पाथरी नगर पालिका ऑन लाईन होऊन
महाराष्ट्रातील काही मोजक्या प्रगत नगर पालिकेच्या यादीमध्ये स्थाना पन्न
झाली आहे .

www.mcpathri.in
या संकेत स्थळावर नगर अध्यक्ष चा संदेश ,विद्यमान कार्य कारिणी ,
स्थायी समिती ,वर्ग निहाय विभाग , व त्यांची विकास कामे तसेच निविदा
,जाहीरनामे उपलब्ध .आहेत आजच्या तरुण वर्गाला समोर ठेवून या संकेत
स्थळावर इतर अनेक सुविधा जसे कि आर एस एस फीड(pathri samachar) ,फेसबुक
, शासकीय संकेत स्थळे पाथरी शहराची एतिहासिक व भोगोलिक माहिती ,हवामान
अंदाज ,पाथरी लोक संख्येची सद्यस्थिती ,पाथरी परिसरातील प्रेक्षणीय स्थळे
इ. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागील कार्याचा ,चालू कार्याचा
,प्रायोजित कार्याचा आढावा उपलब्ध आहे .
या संकेत स्थळाची कल्पना आणि निर्मिती पाथरीचे रहिवासी व व्यवसायाने
साफ्टवेअर इंजिनियर असणारे रवि कोक्कर ,आणि तनय देशमुख यांची आहे

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट