परभणी-पाथरी रस्त्यावर अपघातात चार जण ठार


परभणी। दि. ५ मार्च १३( प्रतिनिधी)
पुण्याहून
परभणीला येणार्या ओमनी कारला
भरधाव ट्रकने समोरून धडक दिल्याने
झालेल्या भीषण अपघातामध्ये चार जण
जागीच ठार झाले. ओमनीमधील इतर
तिघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर
परभणी येथे उपचार सुरू आहेत. ५ मार्च
रोजी सकाळी ६.३0 वाजेच्या सुमारास
हा अपघात झाला. डोहाळ
जेवणासाठी ही मंडळी परभणीला येत
होती.
पुणे येथील आनंद चंद्रकांत उपलेंचवार
यांचा मुलगा अंकुश याचा विवाह
परभणी येथील प्रकाश वामनराव
वट्टमवार
यांची मुलगी उमा हिच्या समवेत दीड
वर्षापूर्वी झाला होता.
उमा ही माहेरी आली असून
तिच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ६
मार्च रोजी होता.
या कार्यक्रमासाठी सासरच्या मंडळींना
निमंत्रण दिले होते. सासरचे आनंद
चंद्रकांत उपलेंचवार (वय ५0),
त्यांची पत्नी सुनंदा (वय ४८),
मुलगा अंकुश (वय २८), मुलगी अंकिता (वय
२५), तसेच शुभांगी पुंडलिक बटकुलवार
(वय ५0), तनुज ओंकार पत्तेवार (वय १0)
आणि श्वेता ओंकार पत्तेवार (वय ३५) हे
सर्व जण ओमनीने (एम.एच.१२-जीआर
६५८४) परभणीला येत होते. ४ मार्च
रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास हे
कुटुंबीय पुण्याहून निघाले. सकाळी ६.३0
वाजेच्या सुमारास
त्यांची गाडी परभणी-
पाथरी रस्त्यावरील
पान्हेरा शिवारात
आली असता पाथरीकडे जाणार्या ट्रकने
(एम.एच.२६-एच.६३१३) कारला समोरून
जोराची धडक दिली. हा अपघात
एवढा भीषण होता की,
ओमनी गाडी ट्रकखाली अडकून
चेंदामेंदा झाली. अंकुश उपलेंचवार हे
गाडी चालवत होते.
अंकुशच्या शेजारी आनंद उपलेंचवार बसले
होते. त्यांच्या पाठीमागील बाजूस अंकुश
यांची आत्या शुभांगी बटकुलवार
आणि अंकुशची बहीण अंकिता उपलेंचवार
बसले होते. हे चौघेही जागीच ठार झाले.

त्यांच्या पाठीमागे
बसलेल्या सुनंदा उचलेंचवार(अंकुशची आई),
श्वेता ओंकार पत्तेवार व तनुज पत्तेवार
हे तिघे जबर जखमी झाले.
त्यांच्या डोक्याला, पोटात मार
लागला असून त्यांना तात्काळ
परभणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक
जे.एस.तांबारे, उपविभागीय पोलिस
अधिकारी राहुल माकणीकर
यांनी अपघातस्थळी भेट देऊन
मदतीसाठी सूचना केल्या. ग्रामीण
पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक
सुभाष सूर्यतळ, जमादार किशोर नाईक,
शेख उस्मान शेख हबीब, किशोर कौठेकर,
खंडू गलांडे, जनार्दन चाटे, सुग्रीव मुंडे
आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य
केले. ट्रकच्याखाली ओमनी दबलेली होती.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने
ट्रकखाली दबलेली ओमनी ट्रॅक्टर लावून
बाहेर काढली. यासाठी पान्हेरा येथील
पोलिस पाटील नवृत्ती घुले, दामोदर
घुले, पेडगाव येथील संतोष देशमुख, शेख
अकबर शेर नूर, अकबर खान अफजल खान,
आजीम खान अफजल खान, शेख अहमद शेख
इस्माईल, अमजत्तुल्ला खुदरतुल्ला, शेख
रज्जाक शेख उस्मान, किन्होळा येथील
मधुकर खरवडे, लक्ष्मण खरवडे
आदींनी मदत केली. गाडीतील मृतदेह
दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले.
घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला होता.
ग्रामीण पोलिस ठाण्यात
सुनंदा उपलेंचवार यांच्या फिर्यादीवरुन
ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
झाला असून पोलिस उपनिरीक्षक सुभाष
सूर्यतळ, किशोर नाईक तपास करीत
आहेत.
राज्यमंत्री फौजिया खान यांची मदत
ही घटना घडली त्यावेळी याच रस्त्याने
राज्यमंत्री फौजिया खान
यांची गाडी जात होती.
त्यांनी तत्परतेने घटनेतील
जखमींना परभणी येथे दुसर्या गाडीने
पाठविण्याची व्यवस्था केली. तसेच
पोलिस
प्रशासनाला माहिती दिल्यानंतर
तातडीने मदतकार्य सुरु झाले

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट