Babajani Durrani :

दलितांची जमीन हडप केलीच नाही; सरकारने सीबीआय,सीआयडी चौकशी करावी : आ.
बाबाजानी दुर्राणीपाथरी-प्रतिनिधी/५दलित बांधवांची आपण जमीन हडप केलेली
नसून,आपणावर लक्ष्मण कांबळे नावाच्या नगरसेवकाने आरोप केलाआहे.सरकारने
दलितांची जमीन हडपकरणार्यांची सीबीआय, सीआयडी चौकशी करावी. आपण
सातत्यानेदलित बांधवांच्या समर्थनार्थ उभे राहिलो असून,
डॉ.बाबासाहेबांच्याविचारांवर आपली निष्ठा असल्याचे मतराष्ट्रवादी
कॉंग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य असलेले आ.बाबाजानी दुर्राणी यांनी
'लोकप्रबोधन'च्या एक्सक्लूजिव्हमुलाखतीत मांडले आहे.पाथरी तालुक्यातील
दलितांची जमीन हडप केल्याच्या प्रकरणावरूनचर्चेत असलेले आ. दुर्राणी
यांची लोकप्रबोधनचे संपादक चेतन शिंदेयांनी मुलाखत घेऊन वस्तूस्थितीजाणून
घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी विरोधकांनी आरोपीच्या पिंजर्यात
जाणिवपूर्वक उभेकेलेल्या दुर्राणी यांनी दलितांची जमीन बळकावल्याच्या
आरोपाचेखंडण करत लक्ष्मण कांबळे या मातंग समाजाच्या नगरसेवकावरतोफ डागली.
आपण लक्ष्मण कांबळेला राजकारणात आणले.समाजाचा विरोध असताना उभे केले आणि
त्याच लक्ष्मण कांबळेयाने जाणिवपूर्वक कार्यकर्त्यांमध्ये मला शिव्या
दिल्यामुळेकार्यकर्त्यांनीत्याला मारहाण केली. त्याचा राग मनात
धरूनआपणावर जाणिवपूर्वक राजकीय द्वेषभावनेतून दलितांची जमीन हडपकेली
असल्याचा आरोप केला जात आहे. मुंबईच्या एका वृत्तपत्रातआपल्याविरोधात या
संबंधाने गेल्या आठवडाभरापासूनदिली जाणारी वृत्ते खोटी व निराधार आहे.
पुराव्याअभावी छापलेजाणारे वृत्ते थांबवण्यासाठी आपणास १कोटी रुपयांची
मागणीही करण्यातआली होती, असेबाबाजानी यांनी आपल्या बचावात भूमिका मांडली
आहे.बौद्धसमाजाच्या व्यक्तीने ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीची
जमीनकायदेशीररित्या खरेदी केली असून,त्या जमिनीच्या प्रकरणाशी आपलाकसलाही
संबंध नाही,किंवा नातेवाईकाचा संबंध नाही. आपण आजपर्यंत एकाही
दलितव्यक्तीची जमीन हडप केलेली नाही, अथवा जमीन हडपकरण्याच्या प्रकरणात
कधीही पडलेलो नाही. गेली ३० वर्षेपाथरी तालुक्यात राजकारण करीत
असून,सर्वसामान्यांचाआपल्यावर असलेल्या विश्वासाचे फलित म्हणूनचआपण
अल्पसंख्यांक समाजाचे असूनदेखील राजकारणातयशस्वी झालो आहोत. बौद्ध,
मातंग, मुस्लीम, चर्मकार वमराठा समाजाचे लोक कायमच आपल्या सोबत उभे
राहिलेले आहेत.जर आपण लोकांच्या जमिनी हडप केल्या असत्या तरलोकांनी
माझ्या आवाहनानंतर पाथरी शहराची नगरपरिषद पूर्णबहुमतात आमच्या ताब्यात
दिली नसती. आपण अल्पसंख्याकसमुहाचे असून, नेहमीच दलित समाजाच्या बाजूने
उभे राहिले आहोत.दलितांच्या सुख-दु:खात सातत्याने सहभागी झालेलो आहोत.
मतदारसंघात आपले सर्व समाजाबरोबरचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत.कायदा
सुव्यवस्था चांगल्या प्रकारे समजत असल्यामुळेच कूळकायद्याची आणि महार
वतनाची जमीन खरेदी-विक्री व्यवहाराची कल्पना आपणास पूर्ण असल्यामुळे
आपणसातत्याने यापासून दूर राहिलो आहोत. मात्र विरोधकांनी विशेषत:लक्ष्मण
कांबळे या कार्यकर्त्याने जाणिवपूर्वक आपल्यावरबिनबुडाचे आरोप केले आहेत.
मुंबईच्या संपादकाने याची खात्री नकरता वृत्ते प्रकाशित करून आपली बदनामी
केली आहे. आपलेराजकीय जीवन बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. जर
आपणदलितांची जमीन हडप केली असेल तरसरकारने सीबीआय,सीआयडी व अन्य सक्षम
यंत्रणामार्फत चौकशी करावी, आपणचौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. जर आपण
दलितांची जमीनहडप केली असेल तर सरकार जी शिक्षा देईल, ती आपणास
मंजूरअसेल, अशी भूमिका आ. दुर्राणी यांनी आपल्या एक्सक्लूजिव्हमुलाखतीत
मांडली आहे. या मुलाखतीतदुर्राणी यांनी तालुक्याच्या विकासावर प्रकाशझोत
टाकत संपादकचेतन शिंदे यांच्या अनेक वादग्रस्त प्रश्नांना उत्तरे दिली
आहेत.पक्षातील स्पर्धक राहिलेल्या फौजिया खान यांचे कौतूक करतआपणाला
मंत्रिपद मिळाले नसले तरी राग नसून, फौजिया खानया माझ्या मोठ्या भगिनी
आहेत, त्यांचे मंत्रिपद म्हणजे माझेमंत्रिपद असल्याची भावना दुर्राणी
यांनी मांडली आहे. चेतन शिंदेयांनी विचारलेल्या अनेक आडव्याप्रश्नांची
उत्तरेदुर्राणी यांनी सरळ दिली आहेत.दुर्राणी यांची खास
एक्सक्यूलिजीव्हमुलाखतवाचा गुरूवारच्या अंकात

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट